राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहा कार्यालये उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी लखनऊ मधील मडियाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. धमक्या देणा-या लोकांची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
लखनौ सोडून इतर ठिकाणी सोमवारी रात्री 8 च्या सुमारास एका व्हाॅट्सअॅप ग्रुपवर उत्तर प्रदेशातील दोन आणि कर्नाटकातील चार कार्यालयांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इतर पाच कार्यालयांना बाॅम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. व्हाॅट्सअॅप ग्रुपमध्ये तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये धमक्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषांचा वापर करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे.
तीन भाषेत धमक्या
पोलिसांनी जाहीर केलल्या माहितीनुसार, अल अन्सारी इमाम राझी उन मेहंदी नावाचा व्हाॅट्सअॅप ग्रुप चालवला जात आहे. या ग्रुपमध्ये तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये काही गोष्टी शेअर केल्या होत्या. ज्यात कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये धमक्या लिहिल्या होत्या.
( हेही वाचा: आता बटण दाबा, ट्रॅफिक थांबवा आणि रस्ता ओलांडा )
एका व्हाॅट्सअॅपव ग्रुपवर हिंदी भाषेत V 49R+ J8 g नवाबगंज उत्तर प्रदेश 271304 असे लिहिले आहे. तुमच्या सहा पक्षाच्या कार्यालयावर 8 वाजता बाॅम्बस्फोट होईल. तुम्हाला शक्य असल्यास, स्फोट थांबवा. नवाबगंज व्यतिरिक्त राजधानी लखनौच्या सेक्टर क्यू मध्ये असलेल्या सरस्वती विद्या मंदिराचाही उल्लेख करण्यात आला आहे. आता मॅसेज करणारे आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर खरी माहिती उघड होईल.