चेंबूरच्या रुपाली चंदनशिवे प्रकरणात महिला पत्रकाराला धर्मांधांकडून धमकी

134

बुरखा घातला नाही, धार्मिक रीतिरिवाज पाळले नाही, म्हणून चेंबूर येथे एका हिंदू विवाहितेची हत्या करण्यात आली. या घटनेच्या वृत्ताकनासाठी गेलेल्या एका मराठी दैनिकाच्या ज्येष्ठ महिला पत्रकाराला धमकावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – ‘जोपर्यंत एकनाथ शिंदे नावाचा वाघ आहे तोवर हिंदुत्वाला जाग आहे’,शिंदे गटाचे बाळासाहेबांना भावनिक पत्र)

चेंबूरच्या पी. एल लोखंडे मार्ग येथे रुपाली चंदनशिवे या विवाहितेची गेल्या आठवड्यात तीच्या मुस्लिम पतीने निर्घृणपणे हत्या केली होती. मागील काही महिन्यांपासून पती पत्नीमध्ये वाद सुरू होता, हा वाद घटस्फोटापर्यंत पोहचला होता. रुपाली चंदनशिवे हिच्या बहिणीने टिळक नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत रुपाली चंदनशिवे हिचे त्याच परिसरात राहणाऱ्या इकबाल शेख यांच्या सोबत प्रेमविवाह झाला होता. इकबाल शेख याचा हा दुसरा विवाह होता. इकबाल शेख याचे कुटुंब रूपालीला मुस्लिम पेहराव करण्यासाठी व घरात हिंदी बोलण्यासाठी दबाव टाकत होते,त्यातून पती पत्नीत वाद झाला होता व रुपाली ही मागील सहा महिन्यांपासून पतीपासून वेगळी राहत होती. इकबाल याने घटस्थापनेच्या दिवशीच रुपाली हिची धारदार शस्त्राने हत्या केली होती.

शनिवारी सकाळी या घटनेच्या वृत्तांकनासाठी दैनिक मुंबई तरुण भारतच्या पत्रकार योगिता साळवी या रुपाली चंदनशिवे हिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेल्या होत्या. रुपालीच्या आई वडिलांची भेट घेऊन त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन कार्यालयाकडे जाण्यासाठी निघाल्या असता नागेवाडी चेंबूर या ठिकाणी एक महिला आणि एका पुरुषाने त्यांची वाट अडवुन ‘मेरा नाम कादीर है, मैं मुस्लिम समाज का कार्यकर्ता हुँ, यहाँ का माहोल पहले से ही खराब है, यह लव्ह जिहाद का मामला नहीं है, हमारे एरिया में आने का नही.. अगर तुम हमारे एरिया में आके यहाँ का माहोल बिघाडगे और कौम को तकलीफ हो गयी तो हम तुमको छोड़ेंगे नही.’ या आशयाची धमकी देऊन जोरजोराने आरडाओरड करू लागले. त्यावेळी तिथे गर्दी होऊ लागल्यामुळे पत्रकार योगिता साळवी यांनी तेथून थेट टिळक नगर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली.

टिळक नगर पोलिसानी अब्दुलकादर मेहबूब बादशहा शेख आणि एका महिलेविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३४१ ( गैरमार्गाने अटकाव करणे) ५०६ (धमकी देणे) ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याची माहिती टिळक नगर पोलिसांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.