अमेरिकन डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपया सर्वकालीन नीच्चांकी दरावर आता पोहोचला आहे. रुपयाचं मूल्य अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८७ रुपये ३३ पैशावर पोहोचलं आहे. मार्च महिन्यातील सगळ्यात मोठी घसरण १० आणि ११ तारखांना बघायला मिळत आहे. ( Rupee Falls )
( हेही वाचा : Loudspeaker on Masjid : मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिस निरीक्षकांची: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)
गेल्या आठवड्यात, शुक्रवारी डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपया १७ पैशांनी मजबूत होऊन ८६.९५ वर बंद झाला होता. पण, नवीन आठवड्याची सुरुवात पुन्हा एकदा घसरणीने झालेली दिसत आहे. भारतीय शेअर बाजारांत (Indian stock market)
परकीय गुंतवणूकदार संस्थांनी केलेली विक्री आणि नवीन भू-राजकीय तणाव यांच्या पार्श्वभूमीवर ही घसरण पाहायला मिळत आहे. रुपयाच्या घसरणीचा अर्थ असा की भारतासाठी वस्तूंची आयात महाग होईल. याशिवाय, परदेशात प्रवास करणे आणि शिक्षण घेणे देखील महाग झाले आहे. येणारे महिने हे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याचे आहेत. आणि तेव्हा अमेरिकन विद्यापीठांमध्ये (American University) प्रवेश घेण्याची इच्छा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा धक्का आहे. शैक्षणिक फॉर्म भरणे, तिथे राहण्या-जेवणाचा खर्च महाग होणार आहे. ( Rupee Falls )
शिवाय डॉलरची (Dollar) किंमत वाढत गेली तर भारताला ती आटोक्यात आणण्यासाठी आपल्याकडील परकीय चलन साठा विक्रीला काढावा लागेल. त्याचा फटका देशात होणारी आयात महाग होण्यात बसणार आहे. जर भारताच्या परकीय चलन साठ्यातील डॉलर (Dollar) अमेरिकेच्या रुपयाच्या साठ्याइतके असेल तर रुपयाचे मूल्य स्थिर राहील. जर आपल्यासोबत डॉलर कमी झाला तर रुपया कमकुवत होईल, जर तो वाढला तर रुपया मजबूत होईल. याला फ्लोटिंग रेट सिस्टम (Floating Rate System) म्हणतात. ( Rupee Falls )
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community