रुपयाचा ऐतिहासिक नीचांक

पुन्हा एकदा रुपया खाली आला आहे. देश विदेशातील प्रतिकूल घटनांच्या एकत्रित परिणामाने सोमवारी रुपयाच्या विनिमय मूल्याचे मोठे नुकसान केले. प्रति डाॅलर आणखी 60 पैशांनी घसरण झाल्याने इतिहासात प्रथमच 77.50 या पातळीवर रुपया गडगडला आहे.

या कारणांमुळे रुपया गडगडला

युक्रेन-रशिया युद्ध, अमेरिकी मध्यवर्ती बॅंकेकडून व्याजदर वाढीबाबत आक्रमकता, चीनमधील कोरोना लाॅकडाऊन त्यामुळे मंदीसदृश्य आर्थिक परिणाम, तसेच विदेशी गुंतवणूकदारांचे देशाबाहेर सुरु असलेले पलायन या कारणांमुळे रुपया दिवसेंदिवस घसरत आहे. खनिज तेलाच्या भडकलेल्या किमती आणि तेलाच्या आयातीसाठी देशातून वाढलेल्या डाॅलरच्या मागणीनेही चलनाच्या घसरणीला हातभार लावला आहे.

( हेही वाचा: मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नावाची रंजक कहाणी )

याआधी रुपया 55 पैशांनी घसरला

रुपयाचे मूल्य प्रति डाॅलर 77.44 या नीचांकपदी गेले आहे. या आधी शुक्रवारी रुपया डाॅलरमागे 55 पैशांनी कोसळून 76.902 वर बंद झाला होता. म्हणजेच सलग दोन दिवसांत घसरणीने रुपयाचे प्रति डाॅलर विनिमय मूल्य 109 पैशांनी कमी झाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here