Ruskin Bond : ५०० हून अधिक पुस्तके लिहिणारे बाल-साहित्यिक रस्किन बाँड

रस्किन बॉंड यांचा जन्म १९ मे १९३४ रोजी पंजाबमधील कसौली येथे झाला.

216
Ruskin Bond : ५०० हून अधिक पुस्तके लिहिणारे बाल-साहित्यिक रस्किन बाँड
Ruskin Bond : ५०० हून अधिक पुस्तके लिहिणारे बाल-साहित्यिक रस्किन बाँड

रस्किन बाँड (Ruskin Bond) हे इंग्रजीतून लेखन करणारे भारतीय लेखक आहे. त्यांची पहिली कादंबरी ’द रुम ऑन द रूफ’ १९५६ मध्ये प्रकाशित झाली आणि या लादंबरीला १९५७ मध्ये जॉन लेलेवेलीन राईस पारितोषिक मिळाले. बाँड यांनी ५०० हून अधिक लघुकथा, निबंध आणि कादंबऱ्या लिहिल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी लहान मुलांसाठी विपुल लेखन केले आहे. Our Trees Still Grow in Dehra यासाठी त्यांना १९९२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

रस्किन बॉंड (Ruskin Bond) यांचा जन्म १९ मे १९३४ रोजी पंजाबमधील कसौली येथे झाला. १७ वर्षांचे असताना त्यांनी त्यांची पहिली कादंबरी लिहायला सुरुवात केली, द रूम ऑन द रूफ, यामध्ये रस्टी नावाच्या अनाथ अँग्लो-इंडियन मुलाची कथा होती. त्यांच्या बहुतेक साहित्यामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या हिल स्टेशन्सच्या जीवन प्रवास फ़िसून येतो. द रूम ऑन द रूफ पुस्तक हे १७ वर्षांचे असताना लिहिले गेले आणि ते २१ वर्षांचे असताना प्रकाशित झाले.

(हेही वाचा – Monsoon Update: अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी वाढणार! येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस)

१९७२ मध्ये प्रकाशित झालेले त्यांचे पहिले बालसाहित्य म्हणजे ’अँग्री रिव्हर’. “माझं बालपण खूप एकाकी होतं आणि यामुळे मला मुलांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत होते.” असं त्यांचं मत होतं. त्यांनी ५० वर्षांहून अधिक काळ लेखक म्हणून काम केले आहे. त्यांनी वेगवेगळ्या शैलींमध्ये प्रयोग केले; सुरुवातीच्या साहित्यात काल्पनिक कथा, लघुकथा, कादंबरी आणि काही आत्मचरित्रात्मक लेखन यांचा समावेश आहे.

पुढे त्यांनी नॉन-फिक्शन, रोमान्स आणि मुलांसाठी पुस्तके लिहिली. निबंध आणि लघुकथा हे त्यांचे आवडते प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांचा प्रदीर्घ लेखन सेवेसाठी त्यांना १९९९ मध्ये पद्मश्री आणि २०१४ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.