#RussiaUkraineWar चर्चेची तिसरी फेरी! जाणून घ्या भारताची भूमिका

98

रशिया-युक्रेन देशांमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत जात असून, सुरू असलेल्या युद्धाचा आज १२ वा दिवस आहे. या दोन्ही देशात चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. पण या दोन्ही फेऱ्यांमधून काहीही निष्पन्न झालेले नाही. शांततेच्या प्रयत्नांबाबत दोन्ही देशांमध्ये आज तिसरी फेरी होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करत तेथील परिस्थिती जाणून घेतली. तसेच भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात मदत केल्याबद्दल पंतप्रधानांनी झेलेन्स्कीचे आभार मानले.

( हेही वाचा : मोठी बातमी! रशियाकडून युक्रेनमध्ये अखेर युद्धविराम, पण…. )

चर्चेची तिसरी फेरी 

आज रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चेची तिसरी फेरी होणार आहे. दोन्ही देशांमधील वाढता तणाव पाहता इस्त्रायल, फ्रान्स आणि तुर्कस्थान हे देश शांततेसाठी प्रयत्न करणार आहेत. याआधीच्या दोन्ही फेऱ्यांमधून काहीही निष्पन्न झाले नव्हते.  रशियाने बॉम्ब हल्ले सुरूच ठेवले आहेत. जर रशियाच्या सर्व मागण्या युक्रेनने मान्य केल्या तर रशियाचे अध्यक्ष पुतिन युद्ध थांबवण्यास तयार आहेत. या युद्धामुळे जवळपास १५ लाख लोकांचे स्थलांतर झाले असून अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चर्चेच्या तिसऱ्या फेरीतून तरी तोडगा निघेल यासाठी अनेक राष्ट्रे प्रयत्नशील असणार आहेत.

पंतप्रधान मोदींनी केली रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवर तब्बल ५० मिनिटे चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनियन आणि रशियन संघांमधील वाटाघाटींच्या स्थितीबद्दल माहिती दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.