रशियाने दिला ‘या’ देशाला पाण्यात बुडविण्याचा इशारा!

183

रशिया विरुद्ध युक्रेन युद्धाच्या निमित्ताने तिसऱ्या महायुद्धाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मागील ६८ दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. या युद्धात ना रशिया विजयी होताना दिसतोय ना युक्रेन माघार घेत आहे. दरम्यान, रशियामधील माध्यमांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मोठं आवाहन केल असून हे आवाहन संपूर्ण जगाची चिंता वाढवणारी आहे. अशातच ब्रिटनला जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्यासाठी त्यांच्या सर्वांत शक्तिशाली अण्वस्त्रांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे घाबरलेल्या रशियाने आता अणुयुद्धाची धमकी दिली आहे. ब्रिटनने रशियाच्या अरे ला – का रे केल्यावर रशियाने ब्रिटनवर पोसेडॉन या अंडरवॉटर ड्रोनचा वापर करून ब्रिटनला बुडवण्याचा इशारा दिला. पण काय आहे हे पोसेडॉन तुम्हाला माहितीये का… जाणून घेऊ या.

(हेही वाचा-तुम्ही सरकारी कर्मचाऱी आहात? मग तुम्हाला मिळणार हा लाभ)

मिळालेल्या माहितीनुसार, पोसेडॉन सुमारे ६५ फूट लांबीच्या ट्यूबने बनला असून साडेसहा फूट डायमीटर आहे. हा टॉर्पेडो पाणबुडीच्या एक किमी खोलवर जाऊन अचूक लक्ष्यभेद करू शकतो तशी त्याची क्षमता आहे. ब्रिटनवर जर या अंडरवॉटर ड्रोनने अण्वस्त्र हल्ला केल्यास ब्रिटनच्या समुद्रकिनाऱ्यावर १६०० फूट उंचीच्या लाटा निर्माण होऊ शकतात. या लाटांमुळे ब्रिटनमधील अनेक महत्त्वाची शहरे बुडू शकतात.

पोसेडॉनची वैशिष्ट्ये

  • पोसेडॉन समुद्राच्या तळाशी तैनात केले जाऊ शकते. दूरवरून त्याचे नियंत्रणही करता येते.
  • संहारकक्षमता इतर देशांच्या पाणबुड्यांपेक्षा कैकपटींनी अधिक आहे.
  • कोणत्याही देशाच्या अण्वस्त्रसुरक्षेच्या चिंधड्या उडवण्याची ताकद या शस्त्रात आहे.
  • स्टेल्थ तंत्रज्ञानाच्या आधारावर पोसेडॉनची निर्मिती केली असल्याने रडारवर ते सहसा दिसत नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.