भारतात आताच्या घडीला अनेक घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारत पुन्हा ISIS च्या निशाण्यावर आहे. भारतात सुसाई़ड अटॅक घडवून आणण्याचा ISIS चा प्लॅन असल्याची माहिती मिळाली आहे. रशियातून भारतात येणा-या एकाला अटक केल्यानंतर, त्याच्याकडून ही धक्कादायक माहिती मिळाली. हा व्यक्ती संशयास्पदरित्या रशियामार्गे भारतात घुसणार होता. त्याचवेळी त्याला भारतात येताना अटक करण्यात आली आहे.
रशिया सिक्युरिटी एजन्सीने दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंधित एका दहशवाद्याची ओळख पटवली होती. त्यानंतर एफएसबीने त्याला ताब्यात घेतले आहे. फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने हा दहशतवादी मध्य आशियातील एका देशाताल नागिरक असल्याचे सांगितले आहे. त्याने भारतातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या कुठल्यातरी बड्या नेत्यावर हल्ला करण्याचा कट आखला होता. सिक्युरिटी सर्व्हिसने याबाबतची माहिती दिली आहे.
( हेही वाचा: सायबर गुन्हे रोखण्यासाठी आउटसोर्सिंगची मदत घेणार, इंटीलिजन्स विभाग तयार करणार – उपमुख्यमंत्री फडणवीस )
Russia detains IS suicide bomber plotting terrorist attack in India
Read @ANI Story |https://t.co/JXM5dVEE6r#ISIS #suicidebomber #India #terroristattack pic.twitter.com/gbd5K6K0FV
— ANI Digital (@ani_digital) August 22, 2022
भाजपचा वरिष्ठ नेता ISIS च्या निशाण्यावर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मध्य आशियातला हा दहशतवादी, तुर्कीत असताना इसिसच्या संपर्कात आला. त्यांनी आत्मघातली हल्ल्याचा कट रचला. हा कट उधळून लावण्यात यश आले आहे. या प्रकरणी आता अधिक चौकशी सुरु आहे.
Join Our WhatsApp Community