स्पुटनिक व्ही कोरोनावरील लस बनवणाऱ्या रशियन शास्त्रज्ञाचा खून

कोरोना काळात अवघ्या जगातील देश पहिली लस कोण बनवणार यावर चढाओढ सुरु असताना रशियाने यात बाजी मारली होती, रशियाने स्पुटनिक व्ही ही कोरोनावरील लस बाजारात आणली. त्या लसीचा जनक असलेल्या शास्त्रज्ञाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे. त्याचा गळा दाबून खून करण्यात आला आहे.

एंड्री बोटीकोव असे त्या शास्त्रज्ञानाचे नाव आहे. त्यांचा पट्ट्याने गळा दाबून खून करण्यात आला. गुरुवारी, 2 मार्च रोजी त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. बोटीकोव हे रशियातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते आणि त्यांना लसीवरील त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कारही मिळाला होता. अहवालानुसार, 2020 मध्ये स्पुटनिक व्ही लस विकसित करणाऱ्या 18 शास्त्रज्ञांपैकी बोटीकोव एक होते.रशियन वृत्तसंस्थेने TASS ने रशियन फेडरेशनच्या तपास समितीच्या हवाल्याने म्हटले आहे की, 47 वर्षीय बोटीकोव, गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अँड मॅथेमॅटिक्समध्ये वरिष्ठ संशोधक म्हणून काम करत होते, गुरुवारी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आले. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कोविड लसीवरील कार्याबद्दल 2021 मध्ये वायरोलॉजिस्टला ऑर्डर ऑफ मेरिट फॉर द फादरलँड पुरस्काराने सन्मानित केले.

(हेही वाचा गड-दुर्ग रक्षण महामोर्च्याचा IMPACT: तीन महिन्यांत स्वतंत्र ‘महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळा’ची होणार स्थापना)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here