रशियाकडून युक्रेनच्या मध्य भागात असलेल्या व्हिनित्शिया शहरावर करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. तसेच जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचा – नौदलात स्वदेशी बनावटीची ‘दुनागिरी’ युद्धनौका दाखल)
मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनमधील व्हिनित्शिया शहरावर रशियाने ७ क्षेपणास्त्रे डागली. त्यातील ४ क्षेपणास्त्रे युक्रेनकडून हवेतच नष्ट करण्यात आली. मात्र अन्य ३ क्षेपणास्त्रे एका इमारतीवर आदळली. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला. येथील परिसरातील गाड्याही स्फोटामुळे जळून खाक झाल्याची माहिती मिळतेय. रशियाकडून वारंवार हल्ले होत असल्याची टीका युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community