युद्धग्रस्त युक्रेनमधून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेले पुणे शहर आणि जिल्ह्यातील रहिवाशी असलेले अशा १६ विद्यार्थ्यांचे (शनिवारी) रात्री १.३० वाजता पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी भाजप पुणे शहर पदाधिकारी आणि गिरीश खत्री मित्र परिवाराच्यावतीने पुष्पहार घालून आणि पेढे भरवून स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे कुटुंबीय सुद्धा हजर होते.
भावनांना वाट मोकळी
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. काही पालकांनी आपल्या मुलांसाठी केक आणला होता, तो कापून विद्यार्थ्यांनी सुटकेचा दिलासा व्यक्त केला. आपल्या मुलांना युद्धग्रस्त संकटातून जीव मुठीत धरून सुखरूप आलेले पाहून, कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. या विद्यार्थ्यांनी कुटुंबियांच्या समवेत हा आनंदाचा क्षण अनुभवून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
( हेही वाचा: “युक्रेनहून भारतीयांना मायदेशी आणण्याची केंद्राची कामगिरी कौतुकास्पद!” )
केंद्राचे प्रयत्न कौतुकास्पद
केंद्र सरकार युक्रेनमधून भारतीय नागरिकांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्राच्या या प्रयत्नांचं सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केलं आहे. आतापर्यंत 17 हजार नागिरकांना मायदेशी परत आणण्यात सरकारला यश आले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी उचलण्यात येणारी सर्व पावले कौतुकास्पद असल्याचे न्यायाधिशांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community