भारतातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी का जातात युक्रेनमध्ये? जाणून घ्या कारण

101

सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या युद्धाची चर्चा सर्वत्र आहे. जगभरात या युद्धाचे पडसाद उमटत आहेत. अशातच भारत युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना युक्रेनमधून सुखरुप मायदेशी परत आणण्यात भारत सरकारला यश आले आहे, पण असं असलं तरी अद्याप  18 हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याने, भारतातील विद्यार्थी इतक्या मोठ्या संख्येने युक्रेनमध्ये का शिकायला जातात हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे भारतातील शेकडो विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी जाण्यामागचं कारण समजून घेऊया.

भारताच्या तुलनेत शिक्षण स्वस्त

युक्रेनमध्ये एमबीबीएसचा अभ्यासक्रम भारताच्या तुलनेत अगदी स्वस्त आहे. भारतात सरकारी काॅलेज सोडलं, तर खाजगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसची पदवी संपादन करण्यासाठी एका विद्यार्थ्यामागे जवळजवळ 1 करोड रुपयांचा खर्च करावा लागतो. याच्या तुलनेत युक्रेनमध्ये हाच अभ्यासक्रम 22 ते 25 लाख रुपयात पूर्ण करता येतो.

एमबीबीएसच्या जागा किती 

देशात एमबीबीएस महाविद्यालयांची कमी आहे. छत्तीसगढ राज्यात सात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या केवळ 725 जागा असल्याने, अनेक विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. अशा परिस्थितीत आपल्या मुला-मुलींना डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पाहणारी अनेक कुटुंबे भरघोस शुल्क  देऊन, आपल्या मुलांना भारतातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून घेतात. पण मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीयांचे पालक भारतात राहून युक्रेन आणि इतर देशांतील वैद्यकीय महाविद्यालयांचे एजंट म्हणून काम करणाऱ्या एजन्सीच्या जाहिरातींच्या जाळ्यात अडकतात. राज्यात सध्या कार्यरत असलेल्या सात वैद्यकीय महाविद्यालयांव्यतिरिक्त तीन खासगी वैद्यकीय महाविद्यालयेही आहेत.

( हेही वाचा : …तरीही मराठीला अभिजात दर्जा न मिळणे ही खेदाची गोष्ट! )

भारताच्या तुलनेत  खर्च कमी

युक्रेनमध्ये भारतातील शुल्कापेक्षा ते ६० ते ७० टक्के कमी शुल्क आकारले जाते. युक्रेनमध्ये एमबीबीएस किंवा इंजिनीअरिंग या दोन्ही विषयांचा अभ्यास कमी खर्चात चांगला होतो. युक्रेनियन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकण्यासाठी, एखाद्याला भारतात दरवर्षी घेण्यात येणाऱ्या NEET परीक्षेत पात्र होणे आवश्यक आहे. त्यानंतर युक्रेन सरकारची परवानगी घेऊन सहज प्रवेश मिळतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.