रशिया-युक्रेन या देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा आज १२ वा दिवस असून हे युद्ध अद्याप थांबायचे काही नाव दिसत नाही. सध्या भारतातील कित्येक नागरिक युक्रेनमध्ये अडकले असून त्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. या नागरिकांची सुटका करण्यासाठी वेळ द्यावा. या मोहिमेदरम्यान दोन्ही देशांनी युद्ध थांबवावे, यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्नशील आहेत. दरम्यान, भारत युक्रेन आणि महासत्ता असलेल्या रशियाच्या मदतीला धावून जात आहे. या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या चर्चेची आज तिसरी फेरी झाली असून दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला. इतकेच नाही तर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशीही चर्चा केली. या चर्चेनंतर आणि मोदींनी केलेल्या सहकार्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा तयार होतेय का? असा सवाल देखील उपस्थितीत होत आहे.
झेलेन्स्कींसोबत काय झाली मोदींचा चर्चा?
यूक्रेनमधील युद्ध स्थितीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी सकाळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला. सकाळी साडेअकरा वाजता फोनवरून संवाद साधला. जवळपास ३५ मिनिटे ही चर्चा झाल्याचे समजते. यावेळी झेलेन्स्की यांनी युद्धाची माहिती मोदींना दिली. यावेळी मोदींनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या चर्चेचे स्वागत केले. शिवाय युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय नागरिक बाहेर काढण्यासाठी मदत करावी, असे आवाहन झेलेन्स्की यांना केले. आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी युक्रेनचे आभारही मानल्याची माहिती मिळत आहे.
Prime Minister Modi spoke on phone to President Volodymyr Zelensky of Ukraine.The phone call lasted for about 35 minutes. The two leaders discussed the evolving situation in Ukraine. PM appreciated the continuing direct dialogue between Russia & Ukraine: GoI Sources
(File pics) pic.twitter.com/oCej7bZZzB
— ANI (@ANI) March 7, 2022
पुतिन यांच्याशी काय बोलले मोदी?
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशीही चर्चा केली. ही चर्चा फोनवरून झाली असून हा फोन कॉल सुमारे ५० मिनिटे चालला. त्यांनी युक्रेनमधील विकसित परिस्थितीवर चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनियन आणि रशियन संघांमधील वाटाघाटींच्या स्थितीबद्दल माहिती दिली. यावेळी मोदी यांनी पुतिन यांना झेलेन्स्की यांच्यासोबत थेट चर्चा करण्याचे आवाहन केले. शिवाय पुतिन यांनी यावेळी सुमी शहरात अडकलेल्या सर्व भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढून घेण्यासाठी मदतीचे आश्वासन दिल्याचे समजते.
PM Modi spoke on the phone to Russian President Putin. The phone call lasted for about 50 min. They discussed the evolving situation in Ukraine. President Putin briefed PM Modi on the status of negotiations between the Ukrainian and Russian teams: GoI Sources
(File pics) pic.twitter.com/KCGv8Sz894
— ANI (@ANI) March 7, 2022
चर्चेच्या तिसऱ्या फेरीतून तोडगा निघणार
आज रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चेची तिसरी फेरी होणार आहे. दोन्ही देशांमधील वाढता तणाव पाहता इस्त्रायल, फ्रान्स आणि तुर्कस्थान हे देश शांततेसाठी प्रयत्न करणार आहेत. याआधीच्या दोन्ही फेऱ्यांमधून काहीही निष्पन्न झाले नव्हते. रशियाने बॉम्ब हल्ले सुरूच ठेवले आहेत. जर रशियाच्या सर्व मागण्या युक्रेनने मान्य केल्या तर रशियाचे अध्यक्ष पुतिन युद्ध थांबवण्यास तयार आहेत. या युद्धामुळे जवळपास १५ लाख लोकांचे स्थलांतर झाले असून अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चर्चेच्या तिसऱ्या फेरीतून तरी तोडगा निघेल यासाठी अनेक राष्ट्रे प्रयत्नशील असणार आहेत.
Join Our WhatsApp Community