Russia Ukraine War: रशियाकडून युक्रेनमध्ये पुन्हा युद्धविरामाची घोषणा

151

गेले चौदा दिवस उलटून गेले तरी रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाकडून करण्यात आलेल्या या युद्धात आता पर्यंत कित्येक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, यासह मोठ्या प्रमाणात वित्त हानी देखील झाली आहे. आताच्या चौदाव्या दिवशीही सहाशेपेक्षा अधिक मिसाईल रशियाने युक्रेनवर डागल्या असून रशियातील महत्त्वाच्या शहरांचा ताबा देखील रशियाने घेतला. रशियाने युद्ध थांबवावे यासाठी अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्र आणि जपानने देखील रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. दरम्यान, बुधवार रशियाकडून युद्ध विरामाची घोषाणा करण्यात आली आहे.

…म्हणून रशियाकडून पुन्हा युद्ध विरामाची घोषणा

गेल्या चौदा दिवसांपासून हे युद्ध सुरू असून या युद्धामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. प्रचंड प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. दुसरीकडे या युद्धात रशियाचे देखील अनेक सैनिक मारले गेले आहेत. रशियाने युद्धबंदीची घोषणा करावी यासाठी रशियावर आंतराष्ट्रीय दबाव वाढत आहे. मात्र रशियाने दबावाला झुगारून युद्ध सुरूच ठेवले होते. मात्र आज बुधवारी रशियाकडून युद्ध विरामाची घोषाणा करण्यात आली आहे. यापूर्वी देखील रशियाकडून युक्रेनमध्ये पाच तासांचा युद्धविराम घेण्यात आला होता. परदेशी नागरिकांना युक्रेनमधून बाहेर पडणे सोपे व्हावे यासाठी युद्ध विराम घेत असल्याचे रशियाने म्हटले होते.

(हेही वाचा – अब्दुल सत्तारांना नोटीस बजावण्याचे आदेश, वाचा काय आहे प्रकरण?)

युरोपीयन देश आक्रमक

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर नाटोचे सदस्य असलेले देश अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकेसह युरोपीयन देशांनी रशियावर कडक आर्थिक निर्बंध घातले आहेत. या निर्बंधाचा मोठा फटका हा रशियाला बसताना दिसून येत आहे. रशियन चलनामध्ये मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. अमेरिकेपाठोपाठ आता जपानने देखील रशियावर निर्बंध लादले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.