अरेरे! रस्त्यांवर मृतदेहांचा खच, युक्रेनची तयार झाली स्मशानभूमी

101

मागच्या 39 दिवसांपासून रशिया युक्रेन युद्ध सुरु आहे. आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, किव्ह राजधानीवर पुन्हा एकदा युक्रेनचा कब्जा झाला आहे. जेव्हा युक्रेनचे सैनिक पुन्हा किव्हमध्ये आले तेव्हा तिथली परिस्थिती अत्यंत भयावह  होती. किव्ह शहरात रस्त्यांवर मृतदेहांचे खचच्या खच पडले होते. त्या मृतदेहांच्या खचाकडे पाहता युक्रेनची राजधानी किव्हमध्ये स्मशानभूमीच तयार झाल्याचे चित्र दिसत आहे.

मानवतेला काळिमा फासणारी दृश्ये

वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एक सामुहिक दफनभूमी या बुका शहरात सापडली आहे. यात 280 जणांचे मृतदेह मिळाले आहेत. किव्ह आणि बुका येथून येत असलेली ही चित्रे मानवतेला काळिमा फासणारी आहेत. काही महिन्यांपूर्वी हसते- खेळते शहर आता उद्ध्वस्त झाले आहे. शहरांतील रस्ते मृतदेहांनी भरले आहेत. या मृतदेहांना जागेवरुन हटवण्यास युक्रेनचे सैन्य धजावत नाहीयेत. कारण या मृतदेहांमध्ये स्फोटके असण्याची शक्यता आहे. त्यामुळे युक्रेनचे सैन्य अगदी सावधगतीने पुढे चालले आहे.

( हेही वाचा: पुन्हा भडकणार जीवनावश्यक वस्तूंच्या किमती? )

बुका शहरात भयावह परिस्थिती

इतकेच नाही, तर किव्ह शहराच्या बाहेरील बुचा भागात परिस्थिती अधिक भयावह असल्याचे समोर आले आहे. येथे युक्रेनच्या सैन्याने मोर्चा सांभाळला आहे. रशियन सैन्याकडून हा भाग परत घेतल्यानंतर होस्टोमेलमध्ये एंटोनोव्ह विमानतळाच्या एंट्रीगेटवर युक्रेनचे सैन्य तैनात झाले आहे. बुकामधील एका सामुहिक स्मशानभूमित 280 मृतदेह आढळून आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.