रशियाने युक्रेनच्या (Russia-Ukraine War) लक्ष्यांवर १२२ क्षेपणास्त्रे आणि ३६ ड्रोन सोडले, ज्यात किमान २७ नागरिक ठार झाले. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (२९ डिसेंबर) याला दुजोरा दिला. हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, २२ महिन्यांच्या युद्धातील हा सर्वात मोठा हवाई हल्ला होता.
गुरुवारी (२८ डिसेंबर) सुरू झालेल्या रशियाच्या हल्ल्यात (Russia-Ukraine War) प्रसूती रुग्णालय, सदनिका आणि अनेक शाळा उद्ध्वस्त झाल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सुमारे १८ तास चाललेल्या हल्ल्यात किमान २७ लोक ठार झाले आणि इतर अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि १४४ जण जखमी झाले आहेत.
(हेही वाचा – Udayanraje Bhosale : महापुरुषांचा अवमान रोखण्यासाठी कायदा करा; उदयनराजे भोसले यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी )
सर्वात मोठा हवाई हल्ला –
युक्रेनचे लष्करप्रमुख (Russia-Ukraine War) वलेरी झालुझनी म्हणाले की; “युक्रेनच्या हवाई दलाने रात्रभर बहुतांश क्षेपणास्त्रे आणि शाहेद ड्रोन पाडले. हवाई दलाचे कमांडर मायकोला ओलेशचुक यांनी त्यांच्या अधिकृत टेलिग्राम वाहिनीवर लिहिले, “फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने पूर्ण युद्ध सुरू केल्यापासूनचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. युक्रेनच्या हवाई दलाच्या मते, यापूर्वीचा सर्वात मोठा हल्ला नोव्हेंबर २०२२ मध्ये झाला होता, जेव्हा रशियाने युक्रेनवर ९६ क्षेपणास्त्रे डागली होती. या वर्षीचा पहिला मोठा हल्ला ९ मार्च रोजी झाला, जेव्हा रशियाने ८१ क्षेपणास्त्रे डागली.
A cemetery in #Chernihiv. Civilians killed by #Russian shelling are buried here. #Russian #RussianWarCrimesInUkraine #RussianSoldiers #RussiaWarCrimes #UkraineRussianWar #UkraineUnderAttaсk pic.twitter.com/X1oYJDmzpU
— Russia-Ukraine War LIVE Updates (@ukraine_info_) April 6, 2022
(हेही वाचा – DCM Devendra Fadnavis : भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी ऊर्जा विभागाला पूर्ण सहकार्य)
युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की म्हणाले की, रशियन सैन्याने (Russia-Ukraine War) बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांसह विविध प्रकारच्या शस्त्रांचा वापर केला. “आज रशियाने आपल्या शस्त्रागारात जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या शस्त्राचा वापर केला आहे”, असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.’’
सलग १८ तास सुरु राहिले हल्ले –
युक्रेनच्या हवाई दलाचे प्रवक्ते युरी इहनात म्हणाले की, “रशियाने युक्रेनच्या (Russia-Ukraine War) विविध लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी त्याच्या ताब्यात असलेल्या सर्व गोष्टींचा स्पष्टपणे वापर केला. गुरुवारी सुरू झालेल्या आणि सुमारे १८ तास सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये राजधानी कीवसह सहा शहरांना आणि पूर्व आणि पश्चिम युक्रेनमधील भागांना लक्ष्य करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
(हेही वाचा – Municipal Corporation : धूळ प्रतिबंधक नियमावलीचे उल्लंघन: ८५९ बांधकामांना काम थांबवण्याची नोटीस )
युक्रेनच्या समर्थनार्थ जगाला एकत्र आणले पाहिजे – ऋषी सुनक
दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले की, या मोठ्या हल्ल्याने युक्रेनच्या (Russia-Ukraine War) समर्थनार्थ पुढील कारवाईसाठी जगाला एकत्र आणले पाहिजे. “युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दमित्रो कुलेबा यांनी एक्स वर लिहिलेः” “आज लाखो युक्रेनियन प्रचंड स्फोटांच्या आवाजाने जागे झाले”. “युक्रेनमधील स्फोटांचा आवाज जगभरात ऐकू यावा अशी माझी इच्छा आहे.
These widespread attacks on Ukraine’s cities show Putin will stop at nothing to achieve his aim of eradicating freedom and democracy.
We will not let him win.
We must continue to stand with Ukraine – for as long as it takes. https://t.co/cf6aDNwPjD
— Rishi Sunak (@RishiSunak) December 29, 2023
हेही पहा –
Join Our WhatsApp Community