युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना रशियाची ऑफर; शिक्षण पूर्ण करण्याची मिळणार संधी

युक्रेन आणि रशियामध्ये सुमारे आठ महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. या दोन्ही देशांमधील संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. युद्धामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागले. आता या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना रशियाने ऑफर दिली आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.

दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये जातात. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तेथील भारतीय विद्यार्थ्यांना मायेदशी आणण्यात आले. युक्रेनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत असेलेले हजारो विद्यार्थी भारतात सुखरुप परतले पण त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला. आता रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ऑफर दिली आहे.

( हेही वाचा: ब्लू टिकधारक धोक्यात; ट्वीटर अकाऊंटची पडताळणी होणार, मस्क यांचे ट्वीट चर्चेत )

दोन्ही देशांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम सारखाच

रशियन काॅन्सुल जनरल आयोग अवदीव चेन्नईमध्ये आले. यावेळी त्यांना सांगितले की, युक्रेन सोडणारे भारतीय विद्यार्थी रशियामध्ये त्यांचे शिक्षण पुन्हा सुरु करु शकतात. कारण दोन्ही देशांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम सारखाच आहे. तसेच, भारतीय विद्यार्थ्यांना रशियामधील लोकांची भाषा समजणेदेखील सोपे जाईल कारण युक्रेनमधील बहुसंख्य लोक रशियन भाषिक आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here