वर्षभरापासून सुरु असलेले रशिया आणि युक्रेन युद्ध संपण्याचे नावच घेत नाही. आता याचदरम्यान अमेरिकन गुप्तचर विभागाने मोठा दावा केला आहे. जर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन जिंकले नाहीत तर ते हे युद्ध संपवण्यासाठी आणि युक्रेनला उद्ध्वस्त करण्यासाठी ते अण्वस्त्र हल्लाही करु शकतात, असे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचे म्हणणे आहे.
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख इर्विन हेन्स यांनी दावा केला आहे की, दीर्घकाळ चाललेल्या युद्धामुळे रशियाचे नुकसान वाढत आहे. आतापर्यंत रशियाचे दीड लाखांहून अधिक सैनिक मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच, रशियाचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे.
( हेही वाचा: सतीश कौशिक यांच्या फार्म हाऊसवर आढळली ‘आक्षेपार्ह औषधे’ )
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अहवालात काय?
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, पुतीन हे युद्ध तीन दिवसांतच संपवण्याचा विचार करत होते, मात्र आता युद्धाला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. अशा स्थितीत ते आता अणुबाॅम्बचा वापर करुन युद्ध संपवण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे युक्रेनची चिंता अधिकच वाढली आहे.