संभाव्य तिस-या महायुद्धात जगाची ‘अशी’ होणार विभागणी! भारताचं समर्थन कोणाला?

101

रशिया- युक्रेन युद्ध पाचव्या दिवशी घनघोर स्वरुपात रुपांतरीत झालं असून, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आता ना संयुक्त राष्ट्र संघाला, ना युरोपीयन महासंघाला जुमानत आहेत. त्यामुळे या युद्धाची दाहकता आणखी वाढली असून, जग तिस-या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. अशा सद्यस्थितीत रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये जगातील कोणकोणते देश कोणत्या देशाला पाठिंबा देतील, यावर आता चर्चा रंगू लागली आहे. 40 वर्षांनंतर पुन्हा एकदा जग दोन गटांत विभागले गेले आहे. संयुक्त राष्ट्राच्या झालेल्या बैठकांमध्ये प्रत्येक देशाने रशिया- युक्रेन युद्धावर आपली मते स्पष्ट केली. झालेल्या या दोन्ही बैठकांमध्ये भारताने तटस्थ भूमिका घेतली असली, तरी मात्र ज्या पद्धतीने या युद्धाचा जोर वाढत आहे, त्यानुसार जग लवकरच तिस-या महायुद्धात झोकलं जाण्याची शक्यता आहे.

या देशांचा युक्रेनला पाठिंबा

रशिया आणि युक्रेन या युद्धाने तिस-या महायुद्धाची ठिणगी पडली आहे. जर तिस-या महायुद्धाला सुरुवात झालीच, तर सध्याची परिस्थिती पाहता,  युक्रेनच्या बाजूने नाटोचे सदस्य असलेले देश असण्याची शक्यता आहे. बेल्जियम, कॅनाडा, डेन्मार्क, फ्रान्स, आईसलॅण्ड, इटली, लग्जमबर्ग, नेदरलॅण्ड, नॉर्वे, पोर्तुगाल, ब्रिटेन आणि अमेरिका पूर्णत: युक्रेनचं समर्थन करतील. जर्मनीही युक्रेनची साथ देऊ शकते. याशिवाय जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया ही युक्रेनचं समर्थन करत आहेत. त्याने रशियावर बंदी घालण्याची घोषणाही केली आहे.

हे देश रशियासोबत

रशियाबाबत बोलायचं झाल्यास क्युबा हा त्यांच्या समर्थनार्थ समोर आलेला पहिला देश आहे. क्युबामध्ये युद्धादरम्यान सीमालगतच्या क्षेत्रांमध्ये नाटोच्या विस्तारावरुन अमेरिकेवर टीका केली होती. दोन्ही देशांनी जागतिक शांततेसाठी कूटनीतीने या मुद्द्यावर तोडगा काढावा असं म्हटलं होतं. तर दुसरीकडे चीन देखील रशियाचं समर्थन करत आहे. चीनने आधीच सांगितलं होतं की, नाटो यूक्रेनमध्ये मनमानी करत आहे. या देशांसह सोव्हिएत संघाचा भाग असलेले आर्मेनिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, तझाकिस्तान आणि बेलारुसही रशियाची साथ देऊ शकतात. या देशांनी रशियाच्या पाठिशी राहण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे या सहा देशांनी सामूहिक सुरक्षा करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्याचा अर्थ असा की, जर रशियावर कोणत्याही देशाने हल्ला केला, तर हे देश रशियाच्या मदतीसाठी पुढे येतील. तसंच रशियावरील हल्ला हा आपल्यावरील असल्याचं समजतील.

इराणही रशियाचं समर्थन करणार

आखाती देशांपैकी इराण हा रशियाची साथ देऊ शकतो. खरंतर रशिया सातत्याने इराणला आपल्या बाजूनं घेण्याचा प्रयत्न करत आहे. आण्विक करार अयशस्वी झाल्यानंतर, दोन्ही देशांमध्ये काहीसा दुरावा आला होता. तर पाकिस्तानही रशियाचं समर्थन करु शकतो, कारण पाकिस्तानचे पंतप्रधान अजूनही रशियाच्या दौऱ्यावर आहेत.

( हेही वाचा: रशियाने ‘हा’ टाकला बाॅम्ब ज्यामुळे हवेतील ऑक्सिजन झाला गायब! )

भारताची भूमिका

भारताने या युद्धात तटस्थ राहणं पसंत केलं आहे. भारत रशियाचा चांंगला मित्र आहे, तर अमेरिकेसोबतही भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे भारत सध्या तरी कोणत्याही बाजूने आपली भूमिका मांडत नाही. भारताच्या जीडीपीचा 40 टक्के भाग फॉरेन ट्रेडमधून येतो. भारताचा बहुतांश व्यवहार अमेरिका आणि त्यांचे सहयोगी पाश्चिमात्य देश आणि आखाती देशांसोबत होतो. भारत पाश्चिमात्य देशांसोबत एका वर्षात सुमारे 350 ते 400 बिलियन डॉलरचा व्यवहार करतो. तर रशिया आणि भारतामध्ये 10 से 12 बिलियन डॉलरचा व्यवहार होतो. त्यामुळे भविष्यात जर एका देशाला पाठिंबा देण्याची वेळ आलीच, तर भारत कोणाच्या बाजूने युद्धात उतरेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.