काही दिवसांपूर्वी म्हणजेच ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमसने केलेला हल्ला हा एकप्रकारचा दहशतवादी हल्लाच आहे. परंतु पॅलेस्टाईनचाही मुद्दा आहे, ज्यावर तोडगा काढायला हवा, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री (S Jaishankar) एस. जयशंकर यांनी रोम येथील सिनेटच्या परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण आयोगाच्या संयुक्त सचिव सत्रात सांगितले.
नेमकं काय म्हणाले जयशंकर?
“७ ऑक्टोबर रोजी जे घडले ते दहशतवादाचे एक मोठे कृत्य आहे आणि त्यानंतरच्या घटना यामुळे संपूर्ण प्रदेश खूप वेगळ्या दिशेने गेला आहे. परंतु निश्चितच प्रत्येकाची अशी आशा असली पाहिजे की अखेरीस, हा देश काही प्रमाणात स्थिर होईल. या अंतर्गत, आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये संतुलन शोधावे लागेल… आपल्या सर्वांना दहशतवाद अस्वीकार्य वाटतो आणि आपण दहशतवादाच्या विरोधात उभे राहिले पाहिजे,” असे जयशंकर (S Jaishankar) म्हणाले.
पुढे जयशंकर (S Jaishankar) म्हणाले की, “पण पॅलेस्टाईनचाही मुद्दा महत्वाचा आहे. पॅलेस्टिनी लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा निघायला हवा. आमचे मत असे आहे की हा द्विराष्ट्र तोडगा असला पाहिजे. जर तुम्हाला तोडगा काढायचा असेल तर तुम्हाला तो संवाद आणि वाटाघाटीद्वारे शोधावा लागेल. तुम्ही संघर्ष आणि दहशतवादाद्वारे तोडगा काढू शकत नाही. त्यामुळे आम्हीही त्याला पाठिंबा देऊ. सध्याची परिस्थिती पाहता आम्हाला विश्वास आहे की आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे. त्यामुळे कोणत्याही गुंतागुंतीच्या परिस्थितीत संतुलन योग्य प्रकारे न राखणे शहाणपणाचे नाही. अतिशय कठीण आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे.”
(हेही वाचा – World Cup 2023 : प्रदूषणामुळे हैराण इंग्लिश खेळाडूंनी घेतला इन्हेलरचा आसरा)
इस्रायल-हमास युद्धाला दिलेल्या प्रतिसादात भारताने (S Jaishankar) दहशतवादाविरूद्ध आणि सार्वभौम, स्वतंत्र आणि व्यवहार्य पॅलेस्टाईन राज्याच्या स्थापनेच्या बाजूने आपली संतुलित भूमिका स्पष्ट केली. हमासच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणाऱ्या आणि इस्रायलला पूर्ण पाठिंबा देणाऱ्या पहिल्या जागतिक नेत्यांपैकी पंतप्रधान मोदी हे एक होते. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत, भारताने गाझामध्ये युद्धविरामाची मागणी करणाऱ्या ठरावावर मतदान करणे टाळले कारण त्यात हमासचा उल्लेख नव्हता आणि हल्ल्याचा निषेधही केला नव्हता.
Warm greetings to FM @JanainaGob and the Government and people of Panama on their National Day.
Look forward to further advancing our strong partnership pic.twitter.com/AH5SfVuVb3
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 3, 2023
आगामी काळ खूप कठीण आणि अशांत
“येणार काळ हा खूप अशांत असणार आहे आणि याची अनेक कारणे आहेत. जर फक्त गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि समाजावरही कोविडचा परिणाम खूप वेदनादायक आहे. अजूनही असे अनेक देश आणि अनेक समाज आहेत जे यातून सावरलेले नाहीत. आम्ही पाहिले आहे की, अनेक देशांमध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांमधील प्रगती मागे घेण्यात आली आहे आणि आज आणखी अनेक देशांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे आणि कर्ज ही एक खूप मोठी समस्या आहे. त्याव्यतिरिक्त युक्रेन युद्धाने जगाच्या प्रत्येक भागावर परिणाम केला आहे “, असेही एस जयशंकर (S Jaishankar) म्हणाले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community