जेव्हा सचिन तेंडुलकर त्याच्या ताटात काय आहे विचारतो, तेव्हा…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जरी जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व बनला असला तरी त्याच्यातील मराठी बाणा अजिबात कमी झाला नाही, किंबहुना तो सण-उत्सवाच्या वेळी हमखास मराठी संस्कृतीचे दर्शन घडवत असतो, यंदाच्या वर्षी होळीच्या निमित्ताने सचिनने त्याच्या ताटात पुरणपोळी आणि वाटीभर दूध घेऊन तो फोटो ट्विटरवर पोस्ट केला आणि ‘तुम्ही ओळखाल का, माझ्या ताटात काय आहे’, अशी विचारणा केली आहे, त्याच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिला असला तरी काही जणांनी त्याला ट्रॉलही केले.

सचिनने याआधी मकरसंक्रातीच्या वेळी स्वतः तिळाचे लाडू बनवले होते आणि त्याच्या रेसिपीचा व्हिडिओही त्याने ट्विटरवर अपलोड केला होता, ज्याला मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिला होता. आता होळीच्या दिवशी सचिनने रंगात रंगलेल्या अवस्थेत हातात ताट घेऊन त्यात पुरणपोळी आणि वाटीभर दूध घेऊन तो फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे, त्याने माझ्या ताटात काय आहे, ओळखा, असे विचारले, त्यावर अनेकांनी अचूक उत्तर दिले.

पण काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रॉल करत ‘तू खासदार आहेस, तुझ्या ताटातला पदार्थ भारतातील अनेकांच्या ताटात नसतो आणि दुर्दैवाने त्यासाठी तू काही करत नाहीस, असे म्हटले आहे.

तर काही जणांनी त्याला मराठी असल्याचे सांगत त्याने इंग्रजी भाषेत ट्विट केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here