वाझेकडून अनिल देशमुखांना क्लीन चीट, म्हणाला…

104

अँटिलिया प्रकरणात अटक केलेला बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने सध्या ईडीच्या अटकेत असलेले तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना चक्क क्लीन चीट दिली. अनिल देशमुख किंवा त्यांचे कर्मचारी किंवा इतर कोणीही त्यांच्या नावाने त्यांच्याकडे कधीही पैशांची मागणी केली नाही, अशी कबुली वाझे याने चांदीवाल आयोगासमोर दिली. चांदीवाल आयोगासमोर १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात उलट तपासणी सुरू आहे. मंगळवारी पुन्हा अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांना आयोगासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी वाझे याने अनिल देशमुख यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली नव्हती, असे सांगितले.

अर्णब गोस्वामी अटकेत सहभाग नव्हता! 

सोमवारी देखील वाझे आणि देशमुख हे आयोगासमोर आले होते.  त्यावेळी देखील वाझेने  टीआरपी प्रकरणाच्या तपासाबद्दल मुंबई पोलिस आयुक्तांनी प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक केले होते, असे आपल्या जबानीत चांदीवाल आयोगाला माहिती देताना नोंदवले. मात्र रायगडच्या प्रकरणात झालेल्या अर्णब गोस्वामीच्या अटकेत आपला मर्यादित सहभाग असल्याची वाझेने कबुली दिली.  रायगडच्या टीमला गोस्वामीचे घर दाखवणे आणि बाकी बंदोबस्ताची व्यवस्था करणे इतकीच जबाबदारी आपल्याला दिली होती, असेही वाझे म्हणाला.

(हेही वाचा मलिकांकडून मोहित भारतींची बदनामी! न्यायालयाचा प्राथमिक निष्कर्ष)

परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणामुळे महाविकास आघाडीची मोठी नाचक्की झाली होती. काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख ‘ईडी’समोर हजर झाले होते. त्यानंतर चौकशी करुन ‘ईडी’ने अनिल देशमुख यांना अटक केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.