वाझेने न्यायालयात ‘जे’ सांगितले त्यामुळे वातावरण झाले गंभीर… असं काय म्हणाला वाझे?

त्याने दिलेल्या उत्तराने न्यायालयाचे वातावरण काही वेळासाठी गंभीर झाले होते.

111

खाजगी रुग्णालयात हृदयावर शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी केलेल्या सचिन वाझेच्या अर्जावर सोमवारी विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीच्या दरम्यान सचिन वाझेला न्यायालयाने त्याचे मत विचारले असता, ‘माझा फादर स्टॅन स्वामी होऊ देऊ नका’, असे वाझेने न्यायालयात सांगितले. या त्याने दिलेल्या उत्तराने न्यायालयाचे वातावरण काही वेळासाठी गंभीर झाले होते.

दरम्यान न्यायालयाने वाझेच्या अर्जावर सुनावणी देत त्याला खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान एनआयएने वाझे आणि सुनील माने यांची कोठडी मिळावी म्हणून न्यायालयाला विनंती केली होती. मात्र न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली आहे.

(हेही वाचाः जॅकलीन अडकली ईडीच्या जाळ्यात… काय आहे आरोप?)

वाझेच्या अर्जावर सुनावणी

अंटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तुरुंगात असलेला बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्यावर मागील काही आठवड्यांपासून जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सचिन वाझेला हृदयविकार असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले होते. दरम्यान वाझेने आपली शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात करण्याची परवानगी मिळावी यासाठी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सोमवारी या अर्जावर विशेष न्यायालयात सुनावणी दरम्यान न्यायालयाने सचिन वाझेला त्याचे मत विचारले. त्यावेळी ‘माझा फादर स्टॅन स्वामी होऊ देऊ नका’, असे उत्तर त्याने दिले.

(हेही वाचाः गॅंग ऑफ ‘वाझे’पूर पार्ट – २ : पोलिसांविरुद्ध खंडणीसह २९ गंभीर गुन्हे नोंद!)

कोण होते फादर स्टॅन स्वामी?

मानवाधिकार कार्यकर्ते आणि भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणी रांची येथून अटक करण्यात आलेले फादर स्टॅन स्वामी यांचे ५ जुलै रोजी न्यायालयाच्या कोठडीत असताना वांद्र्याच्या होली फॅमिली रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. स्वामींवर ते नक्षली चळवळीशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

एनआयएची मागणी फेटाळली

न्यायालयाने वाझेची बाजू ऐकून घेऊन त्याला खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी दिली आहे. ही शस्त्रक्रिया स्वखर्चाने करण्यात यावी असेही न्यायालयाने म्हटले आहे. सचिन वाझेच्या हृदयात तीन ब्लॉकेज असून त्याच्यावर ओपन हार्ट सर्जरी करण्यात येणार आहे. या प्रकरणात या घटनेशी संबंधित मुख्य सूत्रधाराची माहिती आणि काही महत्वाचे पुरावे एनआयएच्या हाती लागले असून, त्याची शहानिशा करण्यासाठी सचिन वाझेला २ दिवस आणि सुनील मानेला ५ दिवसांच्या एनआयए कोठडीची मागणी एनआयएकडून विशेष न्यायालयात करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने एनआयएची ही मागणी फेटाळून लावली आहे.

(हेही वाचाः मंत्री परबांनंतर सेनेच्या खासदार भावना गवळी ईडीच्या रडारवर!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.