मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला सचिव वाझे याच्यावर ह्रदय शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे काही काळासाठी घरातच नजरकैदीत राहण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी वाझे याने विशेष न्यायालयात केली. न्यायालयाने मात्र ही विनंती नाकारली.
काय होती वाझेची मागणी?
विशेष न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांनी वाझे याला तळोजा तुरुंगात पुन्हा पाठवण्यात यावे. त्याआधी त्याला कारागृहातील रुग्णालयात ठेवावे, असे म्हटले. मात्र वाझे याला घरातील अन्न देण्यात यावे, असेही न्यायालयाने म्हटले. वाझे त्याच्यावरील शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याने न्यायालयात ३ महिन्यांसाठी घरातच नजरकैदेत ठेवण्याची मागणी न्यायालयात केली होती. त्याचवेळी घरात असताना पोलिस सुरक्षेत आपल्याला वकिलाला भेटण्याचीही परवानगी देण्यात यावी, असेही म्हटले.
(हेही वाचा : मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी काळजी करू नये! मुख्यमंत्र्यांचे आश्वासन)
…तर वाझे पळून जाईल!
वाझे याच्या विनंतीला विरोध करताना एनआयएने जर वाझेला घरात नजरकैदीत ठेवले तर तो पळून जाईल, असे म्हटले. तळोजा कारागृहाशी संबंधित मुंबईतील रुग्णालय हे चांगल्या सेवासुविधांनी सज्ज आहे. सरकारी विशेष वकील सुनील गोन्सालविस यांनी वाझे याची मागणी नाकारण्याची विनंती केली. मूलभूत हक्कांचे रक्षण व्हावे, यात दुमत नाही, पण न्यायालयाने जनहिताच्या रक्षणासाठी या हक्कांचा समतोल राखणे गरजेचे आहे, असे वकील गोन्सालविस म्हणाले.
Join Our WhatsApp Community