Joy Goswami हे भारतीय कवी आहेत. ते बंगाली भाषेमध्ये कविता लिहितात. जॉय गोस्वामी यांचा जन्म १० नोव्हेंबर १९५४ साली कोलकोता येथे झाला. मात्र त्यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब पश्चिम बंगालमधील राणाघाट स्थलांतरित झाले. त्यांचे बाबा मधू गोस्वामी हे स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान मोठे होते. ते त्यांच्या वडीलांना प्रेरणास्थान मानतात. मात्र ते सहा वर्षांचे असतानाच त्यांचे वडील वारले.
वडील गेल्यानंतर त्यांच्या मातोश्रीनेच त्यांचा सांभाळ केला. त्यांच्या मातोश्रीचे नाव श्रीमती सबिता गोस्वामी. त्या शिक्षिका होत्या. घराची जबाबदारी सांभाळत असतानाच त्यांनी Joy Goswami यांच्यावर बंगाली साहित्याचे आणि भाषेचे संस्कार केले. बंगालीमधील अनेक मोठमोठ्या साहित्यिकांच्या रचना त्या जॉय गोस्वामी यांना वाचून दाखवायच्या. आईच्या संस्कारात वाढलेले जॉय स्वतः सुप्रसिद्ध साहित्यिक झाले.
त्यांच्या आईचा मृत्यू १९८४ मध्ये झाला. त्यानंतर त्यांना अकरावीत शिक्षण सोडावे लागले. पण त्याआधीपासून त्यांनी लिखाणाला सुरुवात केली होती. लहान सहान मॅगझिन्स आणि नियतकालिकांसाठी खूप वर्षे त्यांनी लिखाण केले. त्यानंतर त्यांचे साहित्य सुप्रसिद्ध ’देश पत्रिका’ मध्ये छापून आले. देश पत्रिकामुळे त्यांना चांगलीच प्रसिद्धी लाभली. समीक्षकांनी त्यांची स्तुती केली. आता ते प्रसिद्ध कवी झाले होते.
Joy Goswami यांना बांगला अकादमीतर्फे अनिता-सुनिल बासू पुरस्कार मिळाला आहे. ’घुमियेछो, झाऊपाता?’ यासाठी साठी १९८९ मध्ये त्यांना आनंदा पुरस्कार प्राप्त झाला होता. २००० मध्ये ’पागली तोमार संगे’ या कविता संग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. ’आई आणि मुलगी’ ही त्यांची बंगाली भाषेतील सवोत्तम कविता मानली जाते. २००७ रोजी ’दू दोंदो फवारा मत्रो’ या रचनेसाठी त्यांना मूर्तीदेवी पुरस्कार देखील मिळाला आहे.
Join Our WhatsApp Community