साहित्य गौरव पुरस्कार विजेते Labhshankar Thakar

लाभशंकर ठाकर यांनी वही जाति पाचल रम्य घोष ही कविता पारंपारिक पद्धतीत लिहिली. मात्र लगेच त्यांनी नवीन शैली आत्मसात केली आणि पुढील कविता स्वतःच्या वेगळ्या नि आधुनिक शैलीत लिहिल्या. मनस्नी वत, मारा नामने दरवाजे, बूम कागलमा कोरा अशा वेगळ्या धाटणीच्या कविता लिहिल्या. त्याचबरोबर त्यांनी एकांकिका आणि नाटके देखील लिहिली.

248
साहित्य गौरव पुरस्कार विजेते Labhshankar Thakar

लघारो आणि वैद्य पुनर्वसू या टोपण नावांनी ओळखले जाणारे प्रख्यात गुजराती साहित्यिक म्हणजेच (Labhshankar Thakar) लाभशंकर जाधवजी ठाकर. ते गुजराती कवी, नाटककार आणि कथा लेखक होते. ठाकर यांचा जन्म १४ जानेवारी १९३५ रोजी गुजरातमधील सुरेंद्रनगरजवळील सेडला गावात झाला. ते मूळचे सुरेंद्रनगर जिल्ह्यातील पाटडी गावचे रहिवासी होते. त्यांनी गुजरात विद्यापीठातून १९५७ मध्ये गुजरातीमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स, तर १९५९ मध्ये मास्टर ऑफ आर्ट्स पूर्ण केले.

(हेही वाचा – Cold Weather Update : गारठा वाढणार; पुढच्या काही दिवसांमध्ये तापमानात घट होणार)

शुद्ध आयुर्वेदमध्ये डिप्लोमा –

त्यांनी (Labhshankar Thakar) आयुर्वेदाचे शिक्षण देखील घेतले होते. त्यांनी शुद्ध आयुर्वेदमध्ये डिप्लोमा केला होता. प्रत्यक्षात आयुर्वेदाचार्य म्हणून काम करण्यापूर्वी ते सात वर्षे कोलेजमध्ये शिकवत होते. ते आधुनिक दृष्टीकोन ठेवणारे साहित्यिक होते. ते अ‍ॅब्सर्ड थिएटर आणि प्रायोगिक साहित्याने खूप प्रभावित झाले होते. त्यांनी प्रामुख्याने नाटके आणि कविता लिहिल्या.

(हेही वाचा – Chali chali Re Patang : मकरसंक्रांती निमित्त हिंदी मराठी चित्रपटातील ८० ते ९०च्या दशकातील लोकप्रिय गाण्यांचा बहारदार कार्यक्रम!)

वास्तववादी साहित्य निर्माण –

ठाकर (Labhshankar Thakar) हे आधुनिक कवी होते. त्यांनी पारंपारिक साहित्यकृतीला आव्हान दिले आणि वास्तववादी साहित्य निर्माण केले. त्यांनी वही जाति पाचल रम्य घोष ही कविता पारंपारिक पद्धतीत लिहिली. मात्र लगेच त्यांनी नवीन शैली आत्मसात केली आणि पुढील कविता स्वतःच्या वेगळ्या नि आधुनिक शैलीत लिहिल्या. मनस्नी वत, मारा नामने दरवाजे, बूम कागलमा कोरा अशा वेगळ्या धाटणीच्या कविता लिहिल्या. त्याचबरोबर त्यांनी एकांकिका आणि नाटके देखील लिहिली.

एकूण ५६ पुस्तके लिहिली –

लाभशंकर ठाकर (Labhshankar Thakar) यांनी एकूण ५६ पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी २१ पुस्तके आयुर्वेद आणि उपचार पद्धतीवर बेतलेली आहेत. त्यांना १९६२ मध्ये कुमार चंद्रक आणि नर्मद सुवर्ण चंद्रक मिळाले. १९८० मध्ये त्यांना रणजीतराम सुवर्ण चंद्रक हा पुरस्कार देण्यात आला होता. तसेच १९९१ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २००२ मध्ये त्यांना गुजराती साहित्य अकादमीचा साहित्य गौरव पुरस्कारही मिळाला होता. ६ जानेवारी २०१६ मध्ये अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.