साई श्रावणम हे एक भारतीय संगीत निर्माता, रेकॉर्डिंग आणि स्कोअरिंग अभियंता आहेत. त्यांचा जन्म २५ जून १९८१ रोजी चेन्नई येथे झाला. साई हे सत्य साई बाबांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून आपली प्रतिभा दाखवायला सुरुवात केली. (Sai Shravanam)
झालं असं की ते सहा वर्षांचे होते तेव्हा उस्ताद झाकीर हुसेन यांची तबला वाजवतानाची चहाची जाहिरात पाहिली आणि ते स्वतःहून तबला वाजवू लागले. मग त्यांच्या पालकांनी त्यांना तबला आणून दिला. त्यांचा हात तबल्यावरुन इतका अस्खलित फिरत होता जणू त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली असावी. (Sai Shravanam)
(हेही वाचा – Cemetery : प्रदूषणमुक्तीसाठी महानगरपालिकेचे पाऊल; मुंबईतील ९ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपुरक लाकडी दहन यंत्रणा)
चार वर्षांनंतर झाकीर हुसैन यांच्या नजरेत ते भरले. मग ते झाकीर हुसैन आणि फाझल कुरेशी यांच्याकडून तालवाद्याचे धडे घेऊ लागले. त्यांना अगदी लहानपणापासूनच अनेक दिग्गज लोकांसोबत कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. टाईम्स ऑफ इंडियाने त्यांची स्तुती केली आहे. ते एक अद्भुत व्यक्तिमत्व असल्याचे म्हटले. (Sai Shravanam)
२००४ पासून, साई एक सक्रिय संगीतकार, ध्वनी अभियंता आणि विविध चित्रपट प्रकल्प, शास्त्रीय संगीत अल्बम, माहितीपट इत्यादींची निर्मिती करत आहेत. भारतीय चित्रपट उद्योगात, साई यांनी केवळ दिग्गज संगीतकार ए.आर. रहमान यांच्यासोबत काम केले आहे. तसेच ते चेन्नई शहरातील रिसाउंड इंडियाचे मालक आणि संस्थापक आहेत. (Sai Shravanam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community