आज सिंधी नववर्ष – चेटीचंड २०२४ ! सिंधी समाजाचा सण चेटीचंद हा एक महत्त्वाचा सण आहे. हा वरुण देव (जलदेव) साई झुलेलाल (ज्यांना उदरोलाल म्हणूनही ओळखले जाते) यांचा जन्मदिन आहे. सिंधी लोकांमध्ये हा दिवस अतिशय शुभ मानला जातो आणि मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मराठी नववर्षातील गुढीपाडव्याप्रमाणेच चेटीचंड हा दिवस सिंधी समाजासाठी नवीन वर्षाची सुरुवात मानला जातो. (Saint Jhulelal)
सिंधी समाजाचे प्रमुख आराध्य दैवत संत
सिंधी समाजाचे प्रमुख आराध्य दैवत संत झुलेलाल यांना वरुणदेवाचा अवतार मानले जाते. सिंधी समाजाच्या मान्यतेनुसार, सिंधी समाजाचे संरक्षक संत भगवान झुलेलाल यांचा जन्म सद्भावना आणि बंधुता वाढवण्यासाठी झाला होता. पौराणिक मान्यतेनुसार, समुरा नावाचा जुलमी शासक सिंधी समाजातील लोकांवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत होता. त्यानंतर सिंधी बांधवांनी आपले जबरदस्तीचे धर्मांतर रोखण्यासाठी नदी देवाकडे प्रार्थना केली.
सिंधी लोकांची इस्लामी अत्याचारातून केली सुटका
यानंतर भगवान वरुण यांनी संत झुलेलाल म्हणून जन्म घेतला आणि सिंधी लोकांना इस्लामी अत्याचारातून मुक्त केले. म्हणून या दिवशी भगवान झुलेलालची पूजा केली जाते आणि पारंपरिक नृत्य आणि लोककलांच्या माध्यमातून हा सण साजरा केला जातो. अनेक लोक पौर्णिमेच्या दिवशी तलावाच्या किंवा नदीच्या काठी जाऊन दूध आणि पिठात तांदूळ मिसळून ‘अखो’ अर्पण करतात. जवळपास कोणतीही नदी किंवा असे जलाशय नसल्यास विहिरीला अर्पण करतात.
झुलेलाल जयंती अभिजाततेचा भव्य उत्सव
भगवान झुलेलाल यांची पूजा केल्यानंतर सिंधी समाजातील लोक नाटक, नृत्य, संगीत याद्वारे सांस्कृतिक वातावरणात दंग होतात. लोक त्यांच्या कुटुंबासह आणि मित्रांसह खाण्यासाठी स्वादिष्ट अन्न देखील तयार करतात. पुढे, ते एकमेकांना भेटतात आणि “चेटीचंड ज्यों लख लख बधाईयां आठव” म्हणत नववर्षाच्या शुभेच्छा देतात. झुलेलाल जयंती किंवा सिंधी नववर्ष हा उत्साह, आनंद आणि अभिजाततेचा एक भव्य उत्सव आहे. (Saint Jhulelal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community