पश्चिम उपनगरातील साकिनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ३० वर्षीय महिलेवर नराधमाने सामूहिक बलात्कार करुन, तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकण्यात आला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या महिलेची प्रकृती चिंताजनक होती, तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते, अखेर तिचा ११ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला आहे. साकिनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी मोहन चौहान याच्यावर खुनाचा कलम लावण्यात येणार आहे.
साकिनाका येथील खैरानी रोड परिसरात हा अमानवीय प्रकार घडला होता. साकिनाका पोलिस ठाण्याच्या कंट्रोल रुमला शुक्रवारी पहाटे 3.30च्या सुमारास फोन आला. खैरानी रोड परिसरात एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचे फोनवरुन सांगण्यात आले. ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी ताबडतोब महिलेला राजावाडी पोलिस ठाण्यात दाखल केले. या पीडित तरुणीचे वय 30 वर्षे असल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचा : मुंबईत निर्भया घटनेची पुनरावृत्ती… 30 वर्षीय महिलेवर बलात्कार आणि…)
मी नि:शब्द झाले आहे. ज्या राक्षसी पद्धतीने एखाद्या महिलेवर अत्याचार केले, तिचे आतडे कापले गेले, गुप्तांगात रॉड टाकला गेला. साडेचौदा वर्षांच्या मुलीवर १४ जणांनी बलात्कार केला, सहा वर्षाच्या महिलेवर बलात्कार झाला, आम्ही काही करू शकत नाही. ही आमची हार आहे. कशा पद्धतिने त्या महिलेची आई आणि तिच्या मुली या ठिकाणी बसल्या आहेत, त्यांचा काय दोष? हे सरकार मुर्दाड बनले आहे. किती टाहो फोडायचा? अश्रू दिसत नाहीत का?, महाराष्ट्राच्या लेकी बळींसाठी आम्ही बोलायचे नाही का? लाजा वाटल्या पाहिजे. शक्ती कायदा अजून होत नाही. प्रत्येक सरकाराच्या काळात महिला अत्याचार होतात, पण सरकार काय भूमिका घेते हे महत्वाचे आहे. पण पहिल्या दिवसापासून हे सरकार बलात्काऱ्यांने संरक्षण देत आहे. त्यामुळे वुमन ऍट्रिसिटी तयार करा, विशेष न्यायालयात तयार करा, जामिनाची तरतूद करू नका. आजून हे सरकार महिला आयोगासाठी अध्यक्ष देत नाही, महिला आणि बाळ कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही.
– चित्रा वाघ, उपाध्यक्षा, भाजप
२ मुलींची पीडित महिला!
पीडित मृत महिला ही २ मुलींची आई होती. ज्या टेम्पोत त्या महिलेवर अमानुष अत्याचार करण्यात आले, त्याच टेम्पोतून त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी मोहन चौहान बलात्कार, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले होते, आता त्या आरोपीवर खून करणे हा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीला पोलिसांनी अटक केले. महिलेच्या गुप्तांगांवर तीक्ष्ण शास्त्राने वार केले. त्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव झाला होता.
फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याची मागणी
या प्रकरणीचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा, अशी मागणी होवू लागली. राज्यात महिला असुरक्षित बनल्या आहेत, त्यासाठी राज्यसरकार अपयशी ठरेल आहे, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. तर हे सरकार महिलांवरील अत्याचाराविरोधात शक्ती कायदा हे राज्य सरकार आणत नाही, तो कायदा आणला तर सरकरमधीलच मंत्री दोषी थरातील. त्यामुळे याला सर्वस्वी ठाकरे सरकार कारणीभूत आहे, असे भाजपचे नेते अतुल भातखळकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community