डॉ. सलीम मोइजुद्दीन अब्दुल अली (Salim Ali) हे भारतीय पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव संरक्षक आणि निसर्गवादी होते. विशेष म्हणजे डॉ. अली हे देशातील पहिले पक्षी शास्त्रज्ञ होते, ज्यांनी भारतभर पक्ष्यांचे पद्धतशीरपणे सर्वेक्षण केले आणि पक्ष्यांवर अनेक लेख आणि पुस्तके लिहिली. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांनी भारतातील पक्षीविज्ञानाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कामांमुळे त्यांना “भारताचा बर्डमॅन” म्हणूनही ओळखले जाते.
सलीम अली यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८९६ रोजी मुंबईतील सुलेमानी बोहरा मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांना एकूण ८ भावंडे होती. ते त्यांच्या भावंडात सर्वात लहान. ते जेव्हा १ वर्षांचे होते तेव्हाच त्यांचे वडील मोइझुद्दीन यांचे निधन झाले आणि त्यांच्या वयाच्या तिसर्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले. सलीम आणि त्याच्या भावंडांचे पालनपोषण त्यांचे मामा अमिरुद्दीन तैयाबजी आणि काकू हमीदा यांनी केले. त्यांचे बालपण मुंबईच्या खेतवाडी भागात गेले.
(हेही वाचा Fire Crackers : दिवाळीतील राजकीय फटाके; कुणी मोठा आवाज करतेय, कुणी फुसके ठरतायेत…)
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सचिव डब्ल्यू.एस. मिलार्ड यांने सलीम यांचे पक्ष्यांबद्दलचे कुतूहल पारखले आणि सलीम यांना पक्ष्यांचा अभ्यास करण्यास प्रवृत्त केले. तेव्हापासून सुरु झाला सलीम अली (Salim Ali) यांचा अद्भुत प्रवास. सलीम मोइजुद्दीन अब्दुल अली यांना पक्ष्यांची भाषा समजायची. त्यांनी अनेक पक्षी अभयारण्य उभारण्यात आघाडीची भूमिका बजावली. डॉ.सलीम अली यांनी आपले संपूर्ण आयुष्य पक्ष्यांसाठी समर्पित केले.
डॉ. सलीम अली यांनी नैसर्गिक विज्ञान आणि पक्षीविज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या दिशेने त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक प्रतिष्ठित सन्मान देण्यात आले. अलीगड मुस्लिम विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट दिली. त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यांसाठी भारत सरकारने त्यांना १९५८ मध्ये पद्मभूषण आणि १९७६ मध्ये पद्मविभूषण यांसारख्या महत्त्वपूर्ण नागरी सन्मानांनी गौरवले.
Join Our WhatsApp Community