हाजीर हो! ‘या’ प्रकरणी सलमान खानला न्यायालयाचं समन्स

115

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. पत्रकाराला धमकावल्याचा सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सलमान खानला अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावले आहे.

५ एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे समन्स

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्याला ५ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. हे प्रकरण २०१९ चे आहे. तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवणाऱ्या सलमानचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सलमान सायकल चालवत असताना त्याचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न पत्रकार अशोक पांडे यांनी केला होता. मात्र त्यावेळी सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डने असभ्य वर्तन करत त्यांच्या हातातून त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला होता आणि त्यांना धमकी दिल्याचा आरोप पांडे यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी सलमान विरोधात तक्रार दाखल केली होती. सध्या अंधेरी न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे.

(हेही वाचा – गोध्रा हत्याकांडाची पुनरावृत्ती! प. बंगालमध्ये कुलूपं लावून घरंच पेटवली, १० जणांचा मृत्यू )

सलमानच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ

दरम्यान, एक दिवसापूर्वीच सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात नुकताच मोठा दिलासा मिळाला होता. सलमानच्या याचिकेवर सुनावणी करताना राजस्थान उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी करण्याचे मान्य केले होते. मात्र आता या अभिनेत्याच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.