Sam Harris: नीतिशास्त्र, न्यूरोसायन्स, ध्यान, मनाचे तत्त्वज्ञान, राजकारण, दहशतवाद…विविध विषयांना स्पर्श करणारे लेखक !

168
Sam Harris: नीतिशास्त्र, न्यूरोसायन्स, ध्यान, मनाचे तत्त्वज्ञान, राजकारण, दहशतवाद...विविध विषयांना स्पर्श करणारे लेखक !

सॅम हॅरीस (Sam Harris) यांचा जन्म ९ एप्रिल १९६७ साली कॅलिफोर्निया येथे झाला. त्यांचे वडील अभिनेते होते आणि आई ज्यू होती. हॅरीस दोन वर्षांचे असताना त्यांच्या पालकांचा घटस्फोट झाला. त्यावेळी हॅरीसचे संगोपन त्यांच्या आईने केले. त्यांच्या आईचा देवावर विश्वास नसला तरी हॅरीस हे नास्तिक म्हणून वाढले नाहीत, पण त्यांच्या घरात पूर्णपणे धर्मनिरपेक्ष वातावरण होते.

स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये असताना हॅरीस हे फिलॉसॉफिकडे वळले. त्यांच्या मनात या विषयावर बरेच प्रश्न यायला लागले. याव्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची औषधं न घेता आध्यात्मिक मन:शांती मिळवण्यासाठीही ते सक्षम आहेत असं त्यांना वाटायचं. स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना त्यांनी भारत आणि नेपाळ या देशांचा दौरा केला होता. तिथे त्यांनी हिंदू आणि बौद्ध धर्मीयांकडून ध्यानसाधना म्हणजेच मेडिटेशनविषयी जाणून घेतले. १९९० सालच्या सुरुवातीच्या काळात ते दलाई लामा यांच्या स्वयंसेवी रक्षकांपैकी एक बनले होते.

त्यानंतर ते १९९७ साली जवळपास अकरा वर्षांनंतर स्टँडफोर्ड येथे परतले. तिथे त्यांनी आपलं फिलॉसॉफी विषयांत बीए पदवी शिक्षण २००० साली पूर्ण केलं. सप्टेंबर ११ला झालेल्या हल्ल्यानंतर लगेचच हॅरीस यांनी आपलं द एन्ड ऑफ फेथ नावाचं पुस्तक लिहायला सुरुवात केली. २००९ साली त्यांनी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी येथून कोग्निटिव्ह न्यूरोसायन्स या विषयात पीएचडी ही पदवी मिळवली.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड सुरक्षा प्रदान)

त्यांनी विश्वास, अविश्वास आणि अनिश्चितता यांचे तंत्रज्ञानाच्या आधारावर संशोधन करण्यासाठी फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग यांचा वापर करून एक प्रबंध तयार केला. त्या प्रबंधाचं नाव द मॉरल लँडस्केप: हाऊ सायन्स कुल्ड डीटर्माइन ह्यूमन व्हॅल्यूज असं आहे. २०१८ सालच्या सप्टेंबर महिन्यात त्यांनी वेकिंग अप विथ सॅम हॅरीस नावाचं एक मेडिटेशन कोर्स असलेलं ऍप लॉन्च केलं. त्या ऍपमध्ये त्यांनी मानसशास्त्र, ध्यान, तत्वज्ञान इत्यादी विषयावर समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींची संभाषणेही अपलोड केली आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.