नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक (झोनल डायरेक्टर) असलेले समीर वानखेडे यांना आता साईड पोस्टिंगवर पाठवण्यात आले आहे. आर्यन खान प्रकरणाच्या तपासात निष्काळजीपणा केल्याबद्दल त्याच्यावCर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) त्यांची बदली महासंचालनालय जनरल टॅक्सपेयर सर्व्हिसेस (DGTS), चेन्नई येथे केली.
( हेही वाचा: World No-Tobacco Day : तंबाखूच्या वाढल्या किंमती; तरीही ९० टक्के व्यसनाधीनता कायम )
समीर वानखेडेंवर कारवाई
समीर वानखेडे सध्या डीजीएआरएम मुंबई येथे तैनात होते. त्यांची चेन्नई येथे तत्काळ बदली करण्यात आली. सूत्रांनुसार डीजीटीएस हे साइड पोस्टिंग मानले जाते. समीर वानखेडे हे भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी आहेत. शुक्रवारी एनसीबीने काॅर्डिलिया क्रूझ प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव नव्हते. एजन्सीकडे आर्यन खानविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचे कारण त्यामागे देण्यात आले होते. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या एनसीबी आणि केंद्र सरकारने तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते.
Join Our WhatsApp Community