सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिला तिच्या संपूर्ण कुटुंबांची सुरक्षा धोक्यात आल्याचे वाटत आहे. त्यामुळे क्रांतीने तिच्या कुटुंबाला संरक्षण पुरवण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
घराची रेकी केल्याचा दावा
काही दिवसांपूर्वी तिने ‘लोकांनी आमच्या घराची रेकी करण्यात आली. आम्ही पोलिसांना त्याचे सीसीटीव्ही फुटेजही देऊ’, असे सांगत ‘आमच्या कुटुंबाला संरक्षण पुरवण्यात यावे’, अशी मागणी क्रांती रेडकर हिने केली आहे. समीर वानखेडे यांनी जेव्हा बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ येथून अटक केली. तेव्हापासून समीर वानखेडे हे चर्चेत आले आहेत.
(हेही वाचा : युवा सेना पुढे-पुढे, शिवसेना मात्र मागे…)
पतीच्या पाठीशी उभी राहिली क्रांती
क्रांती रेडकर हीचा २०१७ मध्ये समीर वानखेडे यांच्याशी विवाह झाला आहे. नुकतेच, राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, मलिक आपल्या पतीवर खोटे आरोप करून घाणेरडे राजकारण करत असल्याचे क्रांती यांनी म्हटले होते. मागील चार दिवसांपासून क्रांती ही पतीच्या संरक्षणासाठी समोर आली आहे. तसेच तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रही लिहिले आहे. नुकतेच तिने सह परिवार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेत, सर्व बाजू मांडली. त्यानंतर आठवले यांनी वानखेडे यांना पाठिंबा दिला आहे.
Join Our WhatsApp Community