हिवाळ्यात अथवा पावसाळ्यात वातावरणात गारवा असतो. अशावेळी वाफाळत्या चहासोबत काहीतरी गरम आणि चटपटीत स्नॅक्स खाण्याची इच्छा होते. संध्याकाळी टी टाईम ब्रेकमध्ये बऱ्याच जणांना खुशखुशीत आणि चविष्ट समोसा (Samosa Recipe) खाण्याची लहर येते. कोरोनामुळे सध्या बाहेर मिळणारे विकतचे पदार्थ खाणं आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. कारण हे पदार्थ बनवताना स्वच्छतेची काळजी घेतलेली असेलच असं सांगता येत नाही. मात्र असे चमचमीत पदार्थ स्वतःच्या हाताने घरातच बनवून खाण्यात एक वेगळा आनंद तर आहेच. पण त्यासोबतच असे घरगुती पदार्थ खाणं तुमच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठीही चांगले आहेत. (Samosa Recipe)
हेही वाचा-Jasprit Bumrah चे आयपीएलमध्ये होणार पुनरागमन !
जर तुम्हाला संध्याकाळी समोसा खाण्याची इच्छा असेल तर जाणून घ्या समोसा करण्याची पद्धत. यासाठी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत विविध प्रकारच्या समोसा रेसिपीज मराठीमध्ये. (Samosa Recipe)
घरच्याघरी परफेक्ट समोसा (Samosa Recipe)
1. समोश्याच्या पारीसाठी मैदा मळताना त्यात मोहन घालायलाच हवं, तरच समोसा खुसखुशीत आणि चविष्ट होतो.
2. एक कप मैदा असेल तर त्यात दोन मोठे चमचे तेल घालावं.
3. मोहनासाठी तेल किंवा तूप काहीही घालावं पण वर दिलेल्या प्रमाणातच.
4. मैदा घट्ट मळावा. मैदा हा जर सैलसर असेल तर समोसे खुसखुशीत होत नाही . पारी नरम पडते. पण मैदा खूप घट्टही मळू नये. नाहीतर पारी नीट लाटली जात नाही. ती खाताना जाड लागते.
5. थंडीच्या ¬तुत समोसा तयार करायचा असेल तर मैदा मळताना कोमट पाणी घ्यावं.
6. मैदा मळून झाल्यावर तो दोन तीन तास तरी झाकून ठेवावा. यामुळे मैद्याचे कण सुटतात आणि पारी चांगली लाटली जाते. मैदा मळून तो फ्रिजमधे ठेवून दुसर्या दिवशी समोसे केले तरी छान होतात.
7. समोसा तळताना तेल खूप गरम असता कामा नये. सुरुवतीचे पाच मिनिटं समोसा कमी गरम तेलातच तळावा. समोसा तेलात घातल्यानंतर किमान पाच मिनिटं तरी उलटवू नये. म्हणजे तो फुटत नाही.
8. पारीत सारण भरल्यानंतर कडा पाण्याच्या मदतीनं चिटकवावी.
9. पारीत सारण भरुन समोसे तयार करुन ठेवावेत. ते दोन तास तसेच ठेवावेत. म्हणजे पारी चांगली सुकते. असे समोसे तळल्यानंतर पारीवर फोड येत नाही, ते खमंग होतात.
10. समोश्याचं सारण ओलसर असू नये. यासाठी सारण चांगलं परतायला हवं. सारण ओलसर असेल तर समोसा तळताना सारणाचा ओलसरपणा पारीद्वारे शोषला जातो . पारी नरम पडून समोसा मऊ होतो.
11. सारणासाठीचे बटाटे उकडल्यानंतर ते हातानेच स्मॅश करावेत. ते किसू नयेत. अशा सारणाचे समोसे चांगले होत नाहीत. (Samosa Recipe)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community