समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; अपघातानंतर ट्रकचे दोन तुकडे, एक ठार

समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. अमरावतीजवळ झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. धामणगाव तालुक्यात शेंदुरजनाजवळ भरधाव ट्रक पुलावरुन थेट खाली कोसळला. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रकचे दोन तुकडेच झाले. त्यात एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस करत आहे.

समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस भीषण अपघात होत असून, अपघातांची मालिका सुरु आहे. शुक्रवारी पुन्हा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे समृद्धी महामार्गावरील पुलावरुन ट्रक थेट खाली कोसळला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. हा भरधाव वेगाने जाणारा ट्रक नागपूरहून मुंबईकडे जात होता. मात्र, चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

( हेही वाचा: शिवज्योत घेऊन जाणा-या टेम्पोचा भीषण अपघात; 20 ते 25 शिवभक्त जखमी )

हा अपघात इतका भीषण होता की, अक्षरश: ट्रकचे दोन तुकडे झाले असून, ट्रकवरील कटेंनर हा खाली कोसळला असून ट्रकचा मूळ ढाचा हा पुलावर लटकून पडल्याचे पाहायला मिळाले. या अपघाताने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here