Samudrayaan Mission : भारताच्या समुद्र मोहिमेच्या तयारीला वेग; मंत्री किरेन रिजिजूंनी दिली माहिती

समुद्रयान मोहिमेवर काम करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वाहनाला 'मत्स्य 6000' असे नाव देण्यात आले आहे.

186
Samudrayaan Mission : भारताच्या समुद्र मोहिमेच्या तयारीला वेग; मंत्री किरेन रिजिजूंनी दिली माहिती

भारत आपल्या चंद्रयान ३ आणि आदित्य एल १ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर, (Samudrayaan Mission) समुद्र मोहिमेची तयारी करत आहे. इस्रोकडून समुद्रयान (Samudrayaan Mission) प्रकल्पासाठी सबमर्सिबलच्या साहाय्याने मानवाला समुद्राच्या आत 6000 मीटर तळाशी नेण्याची तयारी सुरू आहे. या मोहिमेच्या यशामुळे सागरी संपत्तीची पाहणी करण्याची संधी तर मिळणार आहेच, शिवाय सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. असे पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले आहे.

काय आहे इस्रोचे समुद्र मिशन?

समुद्रयान प्रकल्प (Samudrayaan Mission) ही भारताची पहिली मानवयुक्त सागरी मोहीम आहे, जी संसाधने आणि जैवविविधतेचा अभ्यास आणि मूल्यांकन करण्यासाठी समुद्रात खोलवर जाईल. हे केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाने सुरू केले आहे. हे मिशन 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या मोहिमेत सबमर्सिबल वाहन वापरण्यात येणार आहे. ते केवळ शोधासाठी वापरले जाईल, परिसंस्थेचे किमान किंवा शून्य नुकसान होईल. चेन्नईची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) या मोहिमेवर काम करत आहे.

समुद्रयान मोहिमेवर काम करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वाहनाला ‘मत्स्य 6000’ असे नाव देण्यात आले आहे.

(हेही वाचा – Maratha Reservation : सध्याचे सरकार खोटारडे नाही; देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत – संभाजी भिडे)

‘मत्स्य 6000’ ही अत्याधुनिक पाणबुडी

ही पाणबुडी (Samudrayaan Mission) टप्प्याटप्प्यानी तयार केली जात आहे. पहिल्यांदाच 500 मीटर खोलीपर्यंत जाण्याची क्षमता असलेली ही पाणबुडी तयार करण्यात आली. यानंतर, भारताने मानवरहित रोबोटिक पाणबुडी समुद्राखाली 6000-7000 मीटर खोलीपर्यंत उतरवली. आता समुद्राची खोली मोजण्याचे काम मानवयुक्त सबमर्सिबलकडे सोपविण्याची तयारी सुरू आहे.

२०२४ पर्यंत पूर्ण होणार पाणबुडीचे काम

मिळालेल्या माहितीनुसार, ही पाणबुडी टायटॅनियम (Samudrayaan Mission) मिश्र धातुपासून बनवली जात आहे. ज्यामध्ये 3 लोक बसू शकतील. सेन्सर बसवलेली ही अत्याधुनिक पाणबुडी असेल जी समुद्राच्या तळातून उठणाऱ्या भूकंपाच्या लाटा शोधण्यात सक्षम असेल. याचा संपूर्ण प्रवास 12 कॅमेऱ्यांच्या मदतीने रेकॉर्ड केला जाणार आहे. ‘मत्स्या 6000’ या सबमर्सिबलची पूर्ण तयारी आणि चाचणी करण्याचे काम 2024 पर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. 2026 मध्ये ते समुद्राच्या खोलवर उतरवले जाईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.