डाळिंबाच्या बागेत गांजाची लागवड; पोलिसांच्या छाप्यात 13 लाखांचा गांजा जप्त

Pomegranate orchards गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील माणिकवाळ गावात समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी छापा टाकत 13 लाख रुपयांचा 133 किलो गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी संशयित महासिद्ध बगली याला अटक केली आहे.

133 किलो 91 ग्रॅम ओला गांजा जप्त

जत तालुक्यातील माणिकनाळ इथे महासिद्ध लक्ष्मण बगली याच्या डाळिंब बागेत छापा टाकून 13 लाख 39 हजार 100 रुपयांचा 133 किलो 91 ग्रॅम ओला गांजा उमदी पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी संशयित महासिद्ध बगली याला अटक केली आहे.

गांजा शेतीसाठी जत तालुका कुप्रसिद्ध

जत तालुक्यात अनेक ठिकाणी गांजा शेती करण्यात येत असल्याचे, अनेक वेळा समोर आले आहे. पोलिसांनी या विरोधात वेळोवेळी कारवाई करत गांजा शेती उद्ध्वस्तदेखील केली आहे. मात्र तरीही इथे गांजाची शेती करणे सुरुच असल्याचे, या कारवाईनंतर पुन्हा एकदा समोर आले आहे.

( हेही वाचा: देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना, चर्चेला उधाण )

एप्रिल महिन्यात ऊसाच्या शेतात छापा, 25 किलो गांजा जप्त

याआधी एप्रिल 2022 मध्येही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार समोर आला होता. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पांढरेवाडी इथल्या मुंजेवस्ती इथे ही घटना उघडकीस आली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here