विद्याधर गोखले लिखित ‘संगीत बावनखणी’ हे नाटक ‘विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान’च्या वतीने प्रतिष्ठानच्या नाट्यसंगीत पदविका प्राप्त गुणी कलाकारांच्या संचात सादर होणार आहे. ह्या नाटकाची रंगावृत्ती आणि नाट्य दिग्दर्शन श्रीकांत दादरकर यांचे असून संगीत मार्गदर्शन ज्ञानेश पेंढारकर यांचे आहे.
(हेही वाचा – रत्नागिरीत Love Jihad साठी आता अल्पवयीन मुसलमान मुलाचा वापर; धक्कादायक प्रकरण उघडीस)
नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून ह्या नाटकाचा मुहूर्त दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी दादरच्या यशवंत नाट्य मंदिरच्या मिनी थिएटर मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. श्रेष्ठ, बुजुर्ग गायक अभिनेते अरविंद पिळगावकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून मुहूर्ताच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. ह्यावेळी नाट्यक्षेत्रातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे, अजित भुरे, मुकुंद मराठे, विजय गोखले, डॉ. जोशी, वर्षा भावे, मंजिरी मराठे इ. मान्यवर उपस्थित होते.
(हेही वाचा – Lata Mangeshkar Puraskar 2024 : गायिका अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर)
सर्वप्रथम नाटकाच्या नांदीने सुरुवात करून त्याबरोबरीने नृत्य व संगीतातून बावनखणीची वास्तू स्वतःची ओळख करून देते हा प्रसंग आणि सुखदेव व बसंती यांचा संगीतमय प्रसंग सादर करण्यात आला. उपस्थित रसिकांची त्याला भरभरून दाद मिळाली. सन्माननीय नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांनी आपल्या मनोगतातून बावनखणी नाटकाचे लेखन, संगीत, नेपथ्य ह्या सर्व गोष्टींची वैशिष्ट्ये तर सांगितलीच पण या नाटकाद्वारे नाटककार गोखले यांनी काळाची पुढची पाऊले ओळखली होती हे ही सांगितले. हे नाटक म्हणजे एक प्रकारे ऑपेराच असून ऑपेराच्या स्वरूपात हे सादर करता येऊ शकेल असे त्यांनी सुचवले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community