सांगली: मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून 4 साधूंना बेदम मारहाण

124

सांगलीत चोर समजून साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा गावात हा सर्व प्रकार घडला. मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून, पालघर प्रकरणाची पुनरावृ्त्ती थोडक्यात टळली.

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा गावात मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन उत्तर प्रदेशातील साधूंना बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. सांगली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही साधू उत्तर प्रदेशचे रहिवाशी असून ते कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते. येथील स्थानिक लोकांना त्यांची भाषा समजू शकली नाही. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर संशय बळावला. मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन गावक-यांनी चारही साधूंना मारहाण केली.

( हेही वाचा: आदित्य ठाकरेंच्या वरळीत ठाकरे गटाला धक्का; युवासेनेचा पदाधिकारी शिंदे गटात सामील )

मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन मारहाण 

मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून गैरसमजुतीतून चारही साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना जत तालुक्यातील लवंगा येथे घडली आहे. उमदी पोलिसांकडून तातडीने कारवाई करुन नागरिकांच्या तावडीतून साधूंना सोडवले गेले. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेलगत असणा-या जत तालुक्यातील लवंगा येथे चार साधूंना सोडवण्यात आले. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेलगत असणा-या जत तालुक्यातील लवंगा येथे चार साधूंना गाडीतून ओढून पट्ट्याने, काठीने मारहाण केल्याची निंदनीय घटना घडली आहे. यावेळी आम्ही साधू असल्याचे वारंवार चौघांकडून सांगितले जात होते. पण संतप्त जमावाने त्यांचे काहीही न ऐकून घेता मारहाण सुरुच ठेवली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत रात्री पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.