सांगली: साधू मारहाण प्रकरणी 25 जणांवर गुन्हा दाखल तर 7 जणांना अटक

सांगलीमध्ये साधू मारहाण प्रकरणी लवंगा गावातील एकूण 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सात जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये सरपंचाच्या मुलाचाही समावेश आहे. मारहाणीनंतर साधूंनी तक्रार देण्यास नकार दिला. मात्र मारहाण करणा-यांना परमेश्वर शिक्षा देईल असे सांगून साधू पुढच्या प्रवासाला गेल्याची माहिती समोर आली आहे. या साधूंना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मुले पळवणारी टोळी समजून साधूंना मारहाण

मुले पळवणारी टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा इथे ही घटना घडली. पोलीस चौकशीत गैरसमजुतीतून मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

( हेही वाचा: ‘बेस्ट’ने जारी केली ऑगस्ट महिन्यात गहाळ झालेल्या स्मार्टफोनची यादी )

कसा घडला प्रकार ? 

वाराणसी इथून चार साधू कर्नाटकात देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून ते लवंगामार्गे विजापूरला जात होते. त्यावेळी रस्त्यात गाडी थांबवून विजापूर रस्ता कोणता अशी विचारणा या साधूंनी एका तरुणाकडे केली. मुले पळवणारी चोरांची टोळी असा कन्नडमध्ये उल्लेख असलेला साधूचा एक व्हिडीओ तरुणाने पाहिला होता. त्या तरुणाकडेच या साधूंनी रस्त्याबाबत विचारणा केली. त्यामुळे शंका आल्याने या तरुणाने ही बाब गावात कळवली. त्यानंतर या चारही साधूंनी गाडीतून ओढून बेदम मारहाण करण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here