सांगलीत भीषण अपघात; भरधाव कार थेट रसवंतीगृहात घुसली अन्…

83

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील खंडोबाची वाडी येथे भरधाव वेगाने जाणारी कार थेट रसवंतीगृहाच्या शेडमध्ये घुसल्यामुळे एका शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. समर्थ संतोष शिंदे या ११ वर्षीय मुलाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला असून रविवारी हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. भिलवडी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून ही दुर्घटना झाल्यावर चालक फरार झाला आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

( हेही वाचा : “वीर सावरकरांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही!” दिल्लीत राहुल गांधींशी चर्चा करणार राऊतांची माहिती )

चालक वाहन सोडून पसार 

तासगाव भिलवडी रोडवर नायरा पेट्रोल पंपाजवळ संतोष गोपाळ शिंदे यांचे रसवंतीगृह आहे. या रसवंतीगृहात हा शाळकरी मुलगा समर्थ बसला होता. भिलवडी स्टेशनकडून भरधाव वेगाने जाणारी सियाज कार (एमएच-10-सीएक्स-4081) रसवंती गृहाच्या थेट शेडमध्ये घुसली आणि समर्थचा जागीच मृत्यू झाला. समर्थ हा खंडोबाचीवाडी विद्यालयात इयत्ता पाचवीमध्ये शिकत होता. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थ जमा होत असल्याचे पाहून चालक वाहन सोडून पसार झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.