सांगलीतील म्हैसाळमधील ९ जणांची आत्महत्या नव्हे तर हत्या!

167

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील ९ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरला. या ९ जणांनी सामूहिक आत्महत्या केली असून ही आत्महत्या सावकारी कर्जापोटीच झाल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले होते. दरम्यान, या प्रकऱणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल २५ जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला होता.

आत्महत्या नसून हत्याकांड

मात्र म्हैसाळमधील या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. त्या ९ जणांची आत्महत्या नसून हत्याकांड झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दोघांनी या लोकांच्या जेवणात विष घालून त्यांना मारल्याचे तपासात उघड झाले आहे.

(हेही वाचा – ‘मनसे’ अ‍ॅक्शन मोडमध्ये; विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर)

सांगलीच्या पोलिसांनी काय दिली माहिती

म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांनी विषारी औषधं घालून जीवे मारल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. गेल्या ८ दिवसांपासून या प्रकरणाचा कसून तपास पोलिसांकडून करण्यात आला. या तपासादरम्यान पोलिसांना यश आले आहे. या प्रकऱणात १९ आरोपी अटकेत आहेत. या आरोपींवर हत्येचं ३०२ कलमान्वे गुन्हे दाखल केले आहेत. २ आरोपींनी विषारी औषधं दिले. बाकी गोष्टी तपासात समोर येतील, अद्याप चौकशी सुरू आहे, अशी माहिती सांगली पोलीस अधिक्षक प्रवीण गोडाम यांनी दिली आहे.

आत्महत्या केलेल्यामध्ये या ९ जणांचा समावेश

आत्महत्या केलेल्यामध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय ५२), संगीता पोपट वनमोरे (४८), अर्चना पोपट वनमोरे (३०), शुभम पोपट वनमोरे (२८), माणिक यल्लाप्पा वनमोरे (४९), रेखा माणिक वनमोरे (४५), आदित्य माणिक वन (१५) अनिता माणिक वनमोरे (२८) आणि अक्काताई वनमोरे (७२) या नऊ जणांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.