‘घोडेबाजार’ शब्दाचा अर्थ आहे तरी काय?

घोडेबाजार… घोडेबाजार… सध्या हा एकच शब्द प्रचंड चर्चेत आहे. हा शब्द सध्या सर्रासपणे वापरला जात आहे.  निवडणुकांदरम्यान, आमदारांचा घोडेबाजार हा शब्द का वापरला जातो? घोडेबाजार या शब्दावर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आक्षेप घेतला आहे. त्यानिमित्ताने या घोडेबाजार शब्दाविषयी थोडे जाणून घेऊया.

घोडेबाजार शब्दाचा इतिहास 

निवडणुकांमध्ये मतांची जी फिरवा फिरव होते, त्यामुळे घोडेबाजार हा शब्द वापरला जात असावा. आमच्या आधीच्या पिढीपासून हा शब्द वापरला जात आहे. त्यानंतर तो आमच्याकडे आला आणि आता पुढील पिढी हा शब्द वापरत आहे. त्यामुळे राजकारणात घोडेबाजार हा काही नवीन शब्द नाही. त्यात घोड्यांचा अपमान व्हावा वा माणसांचा अपमान करावा असा हेतू नाही. व्यवहारात काही शब्द रुढ होत असतात, त्यानुसार हा शब्द रुढ झाला असावा, असे हिंदुस्थान पोस्टशी बोलताना, जेष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर म्हणाले.

( हेही वाचा: Repo Rate म्हणजे काय? RBI च्या पतधोरणानंतर कसे स्वस्त आणि महाग होतात कर्जे? जाणून घ्या )

निवडणुकांमध्ये मतांची जी काही फिरवा फिरवी होते किंवा देवघेव होते त्याला घोडेबाजार म्हणतात. घोडेबाजारात जसे व्यवहार होतात, तसे व्यवहार इथे होतात म्हणून कदाचित घोडेबाजार हा शब्द वापरला जातो असं म्हणता येईल, पण याबाबत काही ठोस पुरावे नाहीत. निवडणुकांमध्ये जी काही मते फिरवली जातात त्या मतांच्या फिरवण्याला घोडेबाजार म्हणण्याची पद्धत ही आपल्या देशाच्या संसदीय राजकारणामध्ये अगदी सुरुवातीपासून रुढ आहे.
प्रवीण बर्दापूरकर, ज्येष्ठ पत्रकार

विरोधकांनाच शंका 

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत घोडेबाजार हा शब्द इतक्या वेळा उच्चारतात की त्यांना घोडेबाजार कुठे सुरु आहे हे माहिती आहे की काय अशी शंका आता विरोधकांनाच येऊ लागली आहे. भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनीही राऊतांच्या घोडेबाजार या शब्दावर आक्षेप नोंदवत काहीही झाले तरी विजय भाजपाचा होणार असे म्हटले. तसेच, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील घोडेबाजार शब्द सतत उच्चारणा-या संजय राऊत यांना टोला लगावला. आमदारांना घोडे म्हणण्याचे पाप हे फक्त गाढवच करु शकतात, असे किरीट सोमय्या म्हणाले.

( हेही वाचा: Mobile recharge देणार मोठा दणका; Airtel, Jio, VI, Idea कंपन्यांचे असे असतील नवे दर )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here