राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारावेळी एका उमेदवाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा केल्यानंतर आज शिवसेना उबाठा गटाद्वारे तीव्र आक्षेप नोंदवला आहे. (Sanjay Raut)
(हेही वाचा-Israel-Hamas conflict: युद्धविराम असूनही, गाझाजवळील इस्त्रायली गावांमध्ये क्षेपणास्त्र इशारा)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थानमध्ये प्रचारासाठी गेले होते, यावर खासदार संजय राऊत म्हणाले की, पुढच्या वर्षी अमेरिकेची निवडणूक आहे. त्यानंतर युरोपातील सात राष्ट्रात निवडणुका होणार आहेत. मुख्यमंत्री हे एवढे मजबूत नेते आहेत. मला वाटते की, अमेरिकेतील शिकागो भागात त्यांच्या सभा लावल्या जाणार आहेत. लवकरच फ्रान्सची निवडणूक आहे, तिथेही त्यांना बोलविले जाईल, असा टोला त्यांनी हाणला. आधी राज्यात महापालिकांच्या निवडणुका घ्या, तिथे प्रचार करून दाखवा. पुण्याची पोटनिवडणूक घेण्यास तुम्ही तयार नाही आणि चालले मोठे जयपूरला, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.