राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने दिल्यानंतर संजय वर्मा यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत वर्मा या पदाचा कार्यभार पाहणार आहेत. (Sanjay Verma)
काँग्रेस (Congress) आणि उबाठा पक्षाच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांना तात्काळ बदलीचे आदेश दिले होते. त्याचबरोबर सेवा ज्येष्ठतेनुसार राज्यातील आयपीएस अधिकाऱ्याकडे (IPS officer) रश्मी शुक्ला यांचा पदभार सोपविण्याचे निर्देश दिले होते. तसेच पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत सेवाज्येष्ठतेनुसार राज्यातील तीन अधिकाऱ्यांची नावे रश्मी शुक्ला यांच्या जागी नियुक्ती करण्यासाठी मागविली होती. परंतु सेवा ज्येष्ठतेनुसार पोलीस महासंचालकपदाचा धुरा संजय वर्मा (डीजी कायदा आणि तंत्रज्ञान) यांच्यावर सोपविण्यात आला आहे. (Sanjay Verma)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community