संपूर्ण भारतावर राज्य करणा-या ‘ईस्ट इंडिया कंपनी’चा मालक एक भारतीय आहे

203

भारत 150 वर्ष इंग्रजांचा गुलाम होता. व्यापार करण्यासाठी भारतात आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने भारतीयांना आपले गुलाम बनवले. आपल्या सुजलाम् सुफलाम् देशाला देशोधडीला लावून इंग्रजांनी ‘सोन्याची चिडीया’ असणा-या आपल्या भारताला लुटले. पण आपल्या देशावर राज्य करणा-या या ईस्ट इंडिया कंपनीचे सध्याचे मालक एक भारतीय आहेत, हे माहितीय का तुम्हाला?

east 1

अशी मिळवली ईस्ट इंडिया कंपनीवर मालकी

संपूर्ण भारतावर राज्य करणा-या ईस्ट इंडिया कंपनीला विकत घेण्याचे स्वप्न संजीव मेहता या मुंबईत राहणा-या उद्योजकाने पाहिले आणि ते सत्यात उतरवले. संजीव मेहता यांचा जन्म ऑक्टोबर 1961 मध्ये मुंबईत एका हि-यांचा व्यापार करणा-या कुटुंबात झाला होता. त्यांचे आजोबा गफूरचंद मेहता यांनी 1920 मध्ये हि-यांचा व्यापर करण्यास सुरुवात केली होती. संजीव मेहता यांनी मुंबईच्या सिडेनहॅम काॅलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले होते. 1983 साली मेहतांनी आपल्या वडिलांच्या व्यवसायात पदार्पण केले. 6 वर्षांत आपल्या वडिलांचा ज्वेलरीचा विषय शिकून ते लंडनला रवाना झाले. तिथून त्यांनी स्टिलच्या भांड्यांचा व्यवसाय सुरु केला. नंतर त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार रशिया, जिनोव्हा, इटली या देशांमध्ये केला आणि ईस्ट इंडिया कंपनी हस्तगत करण्यासाठी त्यांनी स्वत:ला तयार केले.

40 शेअर होल्डर्स असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीला विकत घेणे सोपे नव्हते. पण ईस्ट इंडिया कंपनीचा अभ्यास करुन त्यांनी हा व्यवहार पूर्ण केला. एक भारतीय म्हणून संजीव मेहता यांच्यासाठी हा भावनिक क्षण होता.

east2

( हेही वाचा महाराष्ट्र दिन: मराठी माणसाने वाघाच्या जबड्यात हात घालून असा मिळवला महाराष्ट्र )

‘द ईस्ट इंडिया कंपनी वर मालकी हक्क घोषित

1600 साली स्थापना झालेली ईस्ट इंडिया कंपनी ही 17 व्या आणि 18 व्या शतकात जगातील सर्वात मोठी ट्रेडिंग कंपनी होती. 1757 मध्ये ही कंपनी व्यापाराच्या उद्देशाने भारतात दाखल झाली होती. त्यानंतर अल्पावधीतच या कंपनीने भारतीय बाजारपेठेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आज त्याच ‘द ईस्ट इंडिया कंपनी’वर मालकी हक्क एका भारतीयाने घोषित केला आहे. या कंपनीद्वारे आता भेटवस्तू, दागिने, चहा, काॅफीसारख्या वस्तूंची ऑनलाईन विक्री करण्यात येते.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.