नाशिक तालुक्यातील लहवित भूमिपुत्र व तोफखाना केंद्राच्या २८५ मिडीयम रेजिमेंटचे लान्स नायक संतोष विश्वनाथ गायकवाड यांना आसामच्या लंका नावाच्या ठिकाणी कर्तव्यावर असताना वीरमरण आले आहे. त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात आज, बुधवारी सकाळी नऊ वाजता हुतात्मा झालेल्या संतोष गायकवाड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
(हेही वाचा –चलो अयोध्या! सर्व आमदारांना घेऊन मुख्यमंत्री शिंदे ‘रामलल्ला’च्या दर्शनाला जाणार )
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक तालुक्यातील लहवित येथे राहणारे सध्या सिक्कीमच्या उत्तरेला आसाम राज्यातील होजाई जिल्ह्यातील लंका शहराजवळ बर्फाळ प्रदेशात संतोष गायकवाड हे कर्तव्यावर तैनात होते. रक्त गोठवणाऱ्या थंडीमुळे अचानक त्यांचा मेंदू काम करेनासा झाला. यानंतर तात्काळ त्यांना कोलकत्याच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र याउपाचारादरम्यान, ते हुतात्मा झाले.
ज्या भागात संतोष गायकवाड हे तैनात होते तेथे -15 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान या भागात असते, तेथे गायकवाड हे कर्तव्य बजावत होते. ते आर्टिलर च्या 285 मिडीयम रेजिमेंटच्या लान्स नायक पदावर होते. त्यांचे पार्थिव नाशिकरोडच्या तोफखाना केंद्रात मंगळवारी रात्री बारापर्यंत दाखल झाले. लहवितच्या शेतकरी कुटुंबात गायकवाड हे भारतीय सैन्य दलात तोफखान्याच्या माध्यमातून दाखल झाले होते. त्याच्या जाण्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
Join Our WhatsApp Community