याच साठी केला होता का अट्टाहास? महाराष्ट्र दिनीच संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन बंद

206
याच साठी केला होता का अट्टाहास? महाराष्ट्र दिनीच संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन बंद
याच साठी केला होता का अट्टाहास? महाराष्ट्र दिनीच संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन बंद

मुंबई महापालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरात संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन उभारण्यात आले असून ज्या स्मृती दालनामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास दाखवण्यात आला. परंतु १ मेच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच हे स्मृती दालन बंद ठेवण्यात आले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून उभारलेले हे स्मृती दालन सर्वसामान्यांसाठी खुले न ठेवता अशाप्रकारे बंद ठेवण्यात येत असल्याने याचसाठी का केला होता अट्टाहास असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे.

(हेही वाचा – बारसू रिफायनरी प्रकल्प: सरकारची पवारांशी चर्चा, उद्धव ठाकरेंकडे दुर्लक्ष)

संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि हुतात्म्यांचे बलिदान चिरंतन स्मरणात रहावे म्हणून आणि नवीन पिढीलाही हा इतिहास माहिती व्हावा, यासाठी मुंबई महापालिकेने संयुक्त महाराष्ट्र स्मृतीदालनाची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्गावरील वास्तूमध्ये करण्यात आली. तब्बल १३ वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे स्मृती दालन उभारण्यात आले होते. शिवाजीपार्क येथील तरण तलावाच्या बांधकामांसाठी नेमलेल्या कंत्राटदाराकडून हे काम करून घेण्यात आले. तरण तलावाच्या कामांमध्ये स्मृती दालनाचे काम जोडण्यात आले आणि यासाठी सुमारे दहा कोटी रुपये खर्च करून या स्मृती दालनाची उभारणी करण्यात आली होती. या स्मृती दालनासाठी स्वतंत्र कंत्राटदार न नेमता तरण तलावासाठी नेमलेल्या कंत्राटदाराकडून नियमबाह्य करण्यात आले. परंतु ज्या हेतूने बाळासाहेबांनी या स्मृती दालनाची उभारणी केली ते स्मृती दालन खुले करून संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास जनतेला दाखवण्याचा प्रयत्नही होत नाही. त्यामुळे ही वास्तू बंद ठेवण्यात येत असल्याने याच साठी का आणि तत्कालिन सत्ताधारी पक्षाने या अट्टाहास केला होता का असा सवाल उपस्थित केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.