शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) इतिहास घडला. २२ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच मुकबधिर वकील सारा सनी यांनी केस लढवली. त्या खटल्यात त्यांनी खटल्यात युक्तिवाद केला. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणाची व्हर्चुअल माध्यमातून सुनावणी केली. या खटल्यात वकील सारा सनीचे दुभाषी सौरभ रॉय चौधरी होते, त्यांनी सारांचे हावभाव (साइन लँग्वेज) समजून घेतले आणि कोर्टासमोर त्यांचा युक्तिवाद मांडला.
दुभाषी सौरभ रॉय चौधरी यांना सुनावणी दरम्यान न्यायालयाने (Supreme Court) संपूर्ण वेळ त्यांचा कॅमेरा ऑन ठेवण्याची परवानगी दिली नव्हती. मात्र सौरभ यांनी वकील सारा सनी यांचे हावभाव इतके अचूक आणि पटापट न्यायालयासमोर मांडले त्यानंतर सर्वांना सौरभ यांना पाहण्याची उत्सुकता होती. यानंतर कोर्टाने सौरभ यांना व्हिडिओ ऑन करण्याची परवानगीही दिली आणि सुनावणी संपल्यानंतर सर्वांनी सौरभ यांच्या कामाचे कौतुक देखील केले.
(हेही वाचा – Supreme Court : मराठी पाट्यांवरून सर्वोच्च न्यायालयाकडून व्यापारी संघटनेची कानउघाडणी)
केस संपल्यानंतर मीडियाशी बोलताना वकील सारा यांनी त्यांच्या दुभाषी सौरभ आणि सीजेआयचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, CJI हे खुल्या मनाचे व्यक्ती आहेत, त्यांच्यामुळे अपंगांसाठी नवीन संधी निर्माण (Supreme Court) झाल्या आहेत. या खटल्याच्या सुनावणीसाठी मी तिथे नव्हते. त्यामुळे माझ्या वरिष्ठ संचिता यांनी केसची व्हर्चुअली सुनावणी (Supreme Court) करण्याची व्यवस्था केली. दिव्यांग देखील कोणापेक्षा मागे नाहीत हे त्यांना सिद्ध करायचे होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community